नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस अंमलदाराने खेळ या विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) प्राप्त केली आहे. या बाबत पीएचडी धारक लोपामुद्रा आणेराव यांचे कौतुक होत आहे.
आपल्या खेळाच्या जोरावरच पोलीस दलात आलेल्या लोपामुद्रा दत्ताराव आणेराव यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या. पुढे त्यांनी दि.11 एप्रिल 2019 रोजी विद्यावाचस्पती मिळविण्यासाठी अंतर महाविद्यालयीन लघु अंतर धावण्याच्या स्पर्धेतील सहभागी महिला खेळाडूंच्या व्यक्तीमत्व, आत्मविश्र्वास व निवासी परिसर यांचा क्रिडा कार्यमानावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास या विषयाची नोंदणी केली. त्यांचे मार्गदर्शक डॉ.अश्र्विन बोरीकर हे आहेत.
पोलीस विभागात काम करतांना त्यांचे लग्न पोलीस अंमलदार सुशिल कुबडे यांच्यासोबत झाले आहे. त्यांना दोन पुत्र अशी अपत्ये आहेत. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील 27 वा दिक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत पार पडला. या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रा.भुषण पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वारातीमचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांच्या नेतृत्वात आज लोपामुद्रा आणि त्यांचे पती सुशिल कुबडे यांनी लोपामुद्राला प्राप्त झालेली विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली. सध्या लोपामुद्रा सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर पोलीस ठाणे उस्माननगर येथे कार्यरत आहेत. विद्यावाचस्पती प्राप्त करणाऱ्या लोपामुद्रा आणेराव यांचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी अभिनंदन केले आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा लोपामुद्रा आणेराव यांचे कौतुक करीत आहे.
महिला पोलीस अंमलदाराने प्राप्त केली विद्या वाचस्पती पदवी
![](https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2025/01/IMG_20250129_170357.jpg)