नांदेड(प्रतिनिधी)-बनावट ट्रक क्रमांक वापरून पोलीस, विमा कंपनी, फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड ग्रामीण येथील पोलीस अंमलदार गवेंद्र गंगाधर सिरमलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जानेवारी रोजी कौठा येथे त्यांनी ट्रक क्रमंाक एम.एच.12 एन.एक्स.9980 ची तपासणी केली. ट्रकचा हा खरा क्रमांक असतांना गुरप्रितसिंघ चिमा यांनी बनावट क्रमांक एम.एच.27 बी.एक्स. 8488 हा क्रमांक वापरून पोलीस, विमा कंपनी आणि फायनान्स कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडविला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(2), 336(3), 340(2) प्रमाणे गुरप्रितसिंघ चिमाविरुध्द गुन्हा क्रमांक 92/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मठवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
बनावट क्रमांक वापरून ट्रक चालविणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
![](https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/04/nanded-gramin-police-station.jpg)