नांदेड(प्रतिनिधी)-पाळज ता.भोकर येथील आरोग्य उपकेंद्र फोडून चोरट्यांनी त्यातून संगणकाचे 40 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. कारेगाव ता.धर्माबाद येथे चोरट्यांनी एक घरफोडून 49 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
पाळज ता. भोकर येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी तिरुपती सांभय्या गुणवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 जानेवारीच्या मध्यरात्री 1 ते 4 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी आरोग्य उपकेंद्राचे कुलूप तोडून आतील संगणक, माऊस व किबोर्ड असा 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 36/2025 नुसार दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार लक्षटवार हे करीत आहेत.
कारेगाव ता.धर्माबाद येथील आनंदा केरबा शिंदे यांचे घर कोणी तरी चोरट्यांनी 25 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर ते 2.30 वाजेदरम्यान फोडले. घरातील डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे 49 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 30/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार मठपती अधिक तपास करीत आहेत.
पाळज येथे आरोग्य उपकेंद्र फोडले, कारेगाव ता.धर्माबाद येथे घरफोडले
![](https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/07/Gharfodi.jpg)