नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) नांदेड जिल्ह्यातीलभोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली, देगलूर या दहा तालुक्यात दि.10 फेब्रुवारी 2025 ते दि. 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज दि. 24 जानेवारी 2025 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे मा डॉ संगीता देशमुख मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मा.डॉ.निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार व मा. डॉ राजेश्वर माचेवार साहेब जिल्हा हिवताप अधिकारी तथा हत्तीरोग अधिकारी नांदेड यांच्या नियोजनानुसार नांदेड जिल्ह्यातील वरील तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्तरीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप), आरोग्य निरीक्षक हिवताप, हत्तीरोग यांची कार्यशाळा घेण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेचे मा.डॉ समाधान देबाजे साहेब यांनी नांदेड जिल्ह्यात एमडीए मोहीम सन 2024 मध्ये राबविण्यात आली त्या पीपीटी द्वारे सविस्तर माहिती दिली तसेच या वर्षी मोहीम प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थी यांना वयोगटानुसार डीईसी गोळ्या व अल्बेडाझोल गोळयाची एक मात्रा प्रत्यक्ष खाऊ घालण्यात यावी व मोहीम यशस्वी करावी असे सांगितले.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे संतोष भोसले, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी रेणुका दराडे मॅडम, नांदेड जिल्हा हिवताप कार्यालय येथील संजय भोसले, माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, रवि तेलेंगे, अजित कोटूरवार, परमेश्वर मठदेवरु, चटलावार, खलील, दुधमल, नारळे, गवळी, निमकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.