नांदेड(प्रतिनिधी)-आम्ही कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, स्प्रेक्टरम घोटाळा बऱ्याच वर्षापूर्वीपासून ऐकत आलो. मागील काही दिवसात राख घोटाळा पण ऐकू आला. पण नांदेडमध्ये आता कचरा घोटाळा सुध्दा दिसत आहे.
या संदर्भाची सविस्तर माहिती अशी की, सिडको भागात राहणारे ऍड. प्रसेनजित केरबा वाघमारे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या अर्जानुसार एमआयडीसी सिडको, नवीन नांदेड येथे मनपाच्या कचरा संकल्न व विघटन केंद्रातून लाखो टन कचरा चोरीला जात आहे. मागील काही दिवसांपासून मी या कचरा चोरीचे व्हिडीओ रेकॉर्डींग केले आहे. तसेच माझ्याकडे फोटो उपलब्ध आहेत. महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी काही खाजगी व्यक्तींच्या संगणमताने हा कचरा चोरत आहेत. तो कचरा मनपाच्या केंद्रातून बाहेर घेवून जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हायवा ट्रक व इतर गाड्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण अर्जावर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काय कार्यवाही केली याचा मागो काढता आला नाही.