भारतातील धर्मगुरू नरेंद्र मोदी यंाना भगवान विष्णुचा अवतार म्हणायला लागले आहेत. या बुध्दी या धर्मगुरुंची ज्यांना विष्णुचा अवतार म्हणण्याची हिम्मत ते दाखवतात. त्या व्यक्तीमध्ये असलेल्या कलाकाऱ्यांना त्यांनी कधी पाहिले नाही वाटते. 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 44 वे राष्ट्रअध्यक्ष म्हणून डोनॉल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतला तेंव्हा तेथील महिला धर्मगुरुंनी डोनॉल्ड ट्रम्प यांच्या तोंडावरच त्यांच्यातल्या चुका, त्यांच्यातील घृणेची वृत्ती बदलण्याची सुचना केली तेंव्हा डोनॉल्ड ट्रम्प यांचे तोंड पांढरे झाले होते. याला म्हणतात धर्मगुरू ज्याला धर्माची बाब सांगायची आहे. राजा खुश होईल म्हणून बोलायचे नाही. राजाला खुश करण्यासाठी त्यांच्या दरबारी अनेक भाट असतात. राजाला खुश करण्याची जबाबदारी भाटांचीच असते.
20 जानेवारी रोजी अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली तेंव्हा तेथे त्यांना शुभकामना देण्यासाठी अनेक धर्मगुरू आले होते. त्यात ख्रिचन धर्मगुरु आणि त्या सुध्दा महिला बिशप ऐडगर बुरे या पण उपस्थित होत्या. त्यांनी डोनॉल्ड ट्रम्प यांना शुभकामना देतांना सांगितले की, अमेरिकेत असणारा प्रत्येक विदेशी आमच्या देशाचा शत्रु नाही. अनेक विदेशी आमचे शेजारी आहेत आणि ते आमच्यावर खुप प्रेम करतात. तुमच्या नागरीकता कायद्याने अनेक बालकांचे आई-वडील हे छत्र हरविले जाण्याची भिती तयार झाल्याने ती बालके आता आभाळाकडे पाहत आहेत. तुम्हाला तुमच्यात असलेल्या घृणावृत्तीला बदलायला हवे. प्रत्येक व्यक्तीकडे शत्रुत्वाने पाहाण्याऐवजी मित्रत्वाने त्याला उत्तर द्या तरच अमेरिका पुन्हा एकदा प्रबळ होईल. बिशप ऐडगर बुरे बोलत असतांना डोनॉल्ड ट्रम्प यांचा चेहरा पांढरा फट झाला होता आणि आपण भारतात राहतो. आपल्याकडे तर काही धर्मगुरुंनी कंत्राटच घेतले आहे की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान विष्णुचा अवतार म्हणायला सुरूवात केली आहे. धर्मगुरुंनी फक्त आपल्या धर्मात सांगितलेल्या गोष्टींचा प्रचार करायचा आहे. कोणाची तारीफ करायची नाही किंवा कोणाला तुच लई मोठा आहेस हे दाखवायचे नाही. भारतातील संत प्रेमानंदजी महाराज आणि स्वामी अभिमुक्तेश्र्वरानंदजी म्हणतात एकदा आम्ही आमच्या गाडी चालकाला चाबी दिल्यानंतर तो गाडी चालवित असतांना त्याची चुक झाल्यानंतर आम्ही त्याला बोलतोच नाही. तशाच प्रकारे ज्या नेत्यांना आम्ही मतदार म्हणून निवडूण दिले आहे आणि देश चालवायचे अधिकार दिले आहेत. त्यांची चुक झाल्यानंतर त्यांना बोलायलाच हवे, त्यांच्या चुकांचे विश्लेषण करून सांगायलाच हवे. तरच देश योग्यरितीने चालेल.
अमेरिकेतील खा.बर्नी सॅंडर्स यांनी सुध्दा आपल्या नवीन राष्ट्र अध्यक्षाबद्दल बोलतांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये अमेरिकेतील संपत्तीपैकी सर्वाधिक संपत्ती 3 शेटजींकडे आहे असे सांगितले. डोनॉल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर त्या तिघांच्या संपत्तीमध्ये 233 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचे सांगितले आणि अमेरिकेवर कर्ज तेवढेच असल्याचे सांगितले. प्रदुषणाबद्दल डोनॉल्ड ट्रम्प काहीच बोलले नाहीत. उलट जर्मनीसोबत असलेल्या प्रदुषणाच्या प्रकल्पातून आपले हात काढून घेतले आहेत. त्यांनी हा निर्णय घेताच अमेरिकेच्या लॉन्स एंजल्स या शहरामध्ये पुन्हा आग लागली आहे. लोक तेथून पळून जात आहेत. हा मागील दशक किंवा दोन दशकात वाढलेल्या तापमानाचा परिणाम आहे. त्यावर काही बोलले नाहीत. अमेरिकेमध्ये 8 लक्ष लोक बेघर आहेत. त्यांना राहण्याची सोय काय होईल, कशी करता येईल याबद्दल सुध्दा डोनॉल्ड ट्रम्प काही बोलले नाहीत. अमेरिकेतील आरोग्य व्यवस्था अत्यंत ढासळलेली आहे. अमेरिकेतील लोक दातांच्या ईलाजासाठी दुसऱ्या देशात जातात. त्यांना तो प्रवास खर्च आणि डॉक्टरांचा खर्च करून तो उपचार परवडतो. पण अमेरिकेत होणारा खर्च अत्यंत महाग आहे. जगात सर्वात महाग औषधी अमेरिकेत मिळतात. यावर काही उपया योजना करता येईल काय? याचाही विचार डोनॉल्ड ट्रम्प यांनी केला नाही.
नागरीकता कायदा बदलून डोनॉल्ड ट्रम्प यांनी तयार केलेली हवा ती शेवटी फुसच होणार आहे. कारण त्यांच्या शपथविधी समारंभात बिशप ऐडबर्ड बुरे यांनी सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येक विदेशी व्यक्ती अमेरिकेचा शत्रु नाही तर मग त्यांना बाहेर काढून काय मिळणार. ज्या आई-वडीलांना तेथे आपत्य प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडे तर आज अमेरिकेचे नागरीकत्व आहे. मग छोट्या बाळांना अमेरिकेत ठेवून त्यांच्या आई वडीलांना हकलून लावणार काय? ज्या देशांमधून अवैधरित्या लोक अमेरिकेत येतात. त्यामध्ये भारतासह खंडीभर देशांचा समावेश आहे. ती जी मंडळी येते ती मंडळी कमी वेतना अमेरिकेला सेवा देते. त्यांच्या देशात त्या कमी वेतनाची किंमत खुप मोठी असते. म्हणूनच ते अवैधरित्या अमेरिकेत अवैध रित्या प्रवेश करण्याची हिम्मत करतात. अमेरिकेने अशा सर्वांना काढून टाकले तर अमेरिकेतील लोकांना ज्या वेतनात काम करायचे आहे त्या वेतनात त्यांना काम मिळेल काय आणि अमेरिकेतील काम करणार नाही तर स्वत: मिळणारा हा विदेशी मजुर अमेरिका कोठून आणणार याचाही विचार अमेरिकेला करावा लागेल. एक कोटी अमेरिकेला बाहेर काढायचे असतील तर त्यासाठी लागणारी विमाने, त्याचा खर्च अगोदरच कर्जात असलेली अमेरिका कशी करेल. याचाही विचार डोनॉल्ड ट्रम्प यांना करावा लागेल. त्यामुळे फक्त तोंडघेवडे बोलणे दाखवून मी या जगात सर्वात शहाणा आहे असे म्हणण्यात सुध्दा काही अर्थ नसतो.