नांदेड(प्रतिनिधी)-आमचे मालक गरीबांना 5 हजार रुपयांची मदत करतात असे सांगून एका 62 वर्षीय महिलेला दोन भामट्यांनी फसवणूक करुन तिच्या गळ्यात असलेले सोन्याचे साहित्य बतावणी करून फसवून घेवून गेले आहेत.
जयश्री ईश्र्वरसिंह परमार (62) या महिला मक्का मस्जिद जवळून दि.21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जात असतांना दोन अनोळखी व्यक्ती भेटले आणि आमचे मालक गरीबांना 5 हजार रुपयांची मदत करत आहेत असे खोटे सांगून महिलेकडील 2 ग्रॅम सोन्याचे फुल किंमत 10 हजार रुपयंाचे आणि त्यांच्या गळ्यातील मनीमंगळसुत्र 3 ग्रॅम वजनाचे किंमत 15 हजार रुपयांचे असा 25 हजारांचा ऐवज बतावणी करून घेवून गेले आहेत. इतवारा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 25/2025 नुसार नोंदवली आहे. पोलीस अंमलदार कस्तुरे अधिक तपास करीत आहेत.