नांदेड : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छूक पात्र बचतगटांनी ऑनलाईन अर्ज http://mini.mahasamajkalyan.in या संकेत स्थळावर भरुन त्याची सत्यप्रत 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त नांदेड या कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयान्वये 8 मार्च 2017 रोजी निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
More Related Articles
पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील काम बदली झालेल्या काही लोकांशिवाय चालूच शकत नाही अशा आशयाच्या बातम्या वास्तव…
ओबीसी समाज आक्रमक…
नांदेड(प्रतिनिधी)-आरक्षण बचावचा नारा देत ओबीसी समाजाने नांदेड जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नांदेड-लातूर राज्य महामार्गावरील…
मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो-माधव आटकोरे
नांदेड -अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो.तसेच पर्यावरण संवर्धनासाठी…
