अर्धापूर येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक टी.सी.विक्रीचा व्यवसाय करतात-निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उर्दु) आणि जिल्हा परिषद शाळा हायस्कुल (उर्दु) अशा दोन शाळा आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उर्दु) नई अबादी या शाळेला 8 वी, 9वी आणि 10 वी ही वर्ग वाढ देण्यात येवू नये तसेच या शाळेच्या मुख्याध्यापकांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी करणारा अर्ज अर्धापूर येथील आरटीआय कार्यकर्ता सय्यद मंजुर अली सय्यद खुर्शीदअली यांनी जिल्हा परिषद नांदेड, गट शिक्षणाधिकारी अर्धापूर आणि शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडे दिला आहे.
सय्यद मंजुर अली यांनी दिलेल्या अर्जानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु ही 1990 मध्ये स्थापन करण्यात आलेली शाळा आहे. या शाळेला सन 2009-2010 मध्ये माध्यमिक उर्दु युनिट जोडण्यात आले. मागील 2 वर्षापासून या शाळेतील 100 टक्के निकाल येतो आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतात. शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये नैसर्गिक वाढ दिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील स्थानिक जि.प.प्रा.शा.(उर्दु) नई अबादी अर्धापूर या शाळेस मिळाली. पण या शाळेतील शैक्षणिक व्यवस्थापन, शिक्षक संख्या अपूरी असतांना सुध्दा या शाळेला 8 वी वर्ग वाढ देण्यात आली आहे. याच्यामुळे जिल्हा परिषद हायस्कुल उर्दु या शाळेतील पटसंख्या कमी झाली आणि तेथे दोन शिक्षक अतिरिक्त ठरले. या दोन्ही शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. दोन्ही शाळांमध्ये एक किलो मिटर पेक्षा कमी अंतर आहे. तरी पण येथील मुख्याध्यापकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन, शासनाची दिशाभुल करून 8 वी वर्ग वाढ मिळवली आहे. ही वर्ग वाढ फक्त जास्तीचे अनुदान मिळावे म्हणून केली आहे. तसेच नवी आणि 10 वी ही वर्ग वाढ मिळावी यासाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदे प्राथमिक शाळा नई अबादी अर्धापूर येथील मुख्याध्यापक मोहम्मद आयुब अब्दुल गणी हे डॉ.इकबाल उर्दु शाळा या संस्थेकडून पैसे घेवून टी.सी. विक्रीचा कारभार वर्षानुवर्षे करत आले आहेत. त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!