नांदेड -महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्या वतीने नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
बालाजी किरवले यांच्या अविरत समाज कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. रविवारी दि. १९ जानेवारी २०२५ रोजी समृद्धी मंगल कार्यालय पद्मावती रोड आळंदी दे. पुणे येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकार्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात
• प्रमुख पाहुणे –
मा.श्री.जयसिंग (तात्या) शेंडगे (जेष्ठ नेते तथा अध्यक्ष, धनगर साहित्य परिषद महाराष्ट्र) मा.श्री.बाळासाहेब किसवे (राज्यमंत्री शेळी मेंढी विकास महामंडळ),
• प्रमुख उपस्थिती –
मा.श्री.राहुल चिताळकर-पाटील माजी नगराध्यक्ष आळंदी देवाची नगरपरिषद, मा.मदनजी रेनगडे-पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी
डॉ. शुभम साळी संस्थापक धारुमा हिलिंग सेंटर पुणे
ऍड. चैतन्य केंगार जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर,
मा.भागवत काटकर अध्यक्ष नेचर फाउंडेशन आळंदी दे.,
मा.अर्जुन मेदनकर पत्रकार दैनिक सामना, मा. श्रीकांत बोरावके पत्रकार दैनिक पुढारी, मा.रमेश क्षीरसागर, सौ.सुमनताई क्षीरसागर
• आयोजक
ऍड. आकाश पुजारी महाराष्ट्र फाउंडेशन संस्थापक/अध्यक्ष
ऍड. लावण्या आडम महाराष्ट्र फाउंडेशन सचिव
या पुरस्कार बदल सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहे.