नांदेड :- समाज कल्याण विभागाचा विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नुकताच 17 व 18 जानेवारी रोजी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागातील धाराशिव, हिंगोली, लातूर व नांदेड येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संघाचे खेळाडू सहभागी झाले होते.
विभागातील 4 जिल्ह्यातील खेळांडुसाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, धावण्याची स्पर्धा व इनडोर स्पर्धामध्ये बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुद्धिबळ या स्पर्धेचा समावेश होता. या विभागीय स्पर्धा सहायक आयुक्त शिवानंद निमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.