लोकशाहीतून निर्माण झालेल्या राजकीय घराण्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. मूळनिवासी असलेली मानसिक दृष्ट्या गुलाम जमातीतील घराणी. व बाहेरून आलेली स्वतःला आर्य ब्राह्मण म्हणविनारी मानसिक दृष्ट्या मालक जमात असलेली घराणी.
बीडच्या मुंडे घराण्यातील पुढची पिढी कशी वागली याबद्दल संतोष देशमुख यांच्या हत्येतून जनतेसमोर आले. ठाकरे घराण्याशी संबंधित असलेले किनी प्रकरण प्रचंड गाजले होते. राणे घराण्याशी संबंधित रत्नागिरी कणकवली हद्दीतील खुनांचा गवगवा झाला होता. सातारच्या भोसले घराण्याच्या नगरसेवक शरद लेवे यांच्या हत्येची केस तर मी स्वतः हाताळली होती. आरोपी म्हणून उदयनराजे यांना अटक केल्यावर गृहमंत्री गोपीनाथजी मुंडे यांनी फोन करून अटक का केली असा मला जाब विचारला होता. व तुम्ही बारामतीचे असल्याने राष्ट्रवादीचे काम करीत आहात असा आरोप माझ्यावरच केला होता. एक महसूल राज्यमंत्री व तेरावे वंशज यांना अटक करूनही जिल्ह्यात पूर्ण शांतता राखली गेली हे पोलीस दलातील कायदा सुव्यवस्था हाताळण्याचे एक आदर्श उदाहरण म्हणून त्याची आजही चर्चा होते. तरीपण भाजप शिवसेनेचे सरकार गेल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. अजित पवार सातारचे पालकमंत्री बनले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे माझी सातारा वरून लगेच उचलबांगडी केली. मयत लेवे यांचे प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवले .उदयनराजे यांना बेड्या घातलेल्या अवस्थेमध्ये आमच्या पुढे उभे करा त्याशिवाय आम्ही प्रेत हलवणार नाही अशी मागणी त्यांचे चुलते अभय सिंह राजे यांनी केली होती. मी ती धुडकावून लावली होती. खोपडे हा बीजेपी शिवसेनेचा माणूस आहे असा आरोप माझ्यावर ठेवला होता.
” गेले अनेक वर्ष आश्वासन देऊन आमच्या गावाला पाणी दिले नाही. ते कधी देणार ” असा प्रश्न एका तरुणाने अजित दादांना मासाळवाडी येथे प्रचार सभेत विचारला होता.” उचला रे त्याला ” असा आदेश त्यांनी पोलीस व इतर कार्यकर्त्यांना दिला. ” माझ्या उमेदवाराला मतदान केले नाही तर गावाचे पाणी बंद करेल ” अशी धमकी अजित दादांनी दिली होती. त्या तरुणाला रात्रीच गाव सोडावे लागले. त्याची आई दारोदार आपल्या संरक्षणाची भिक मागू लागली. तो तरुण भारतीय सैन्यात सीमेचे रक्षण करीत होता. सुट्टीसाठी गावी आला होता . मी त्या विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.पण लगेच मासाळवाडीच्या लोकांना मंदिरात गुलाल उचलून शपथ घ्यायला लावली.
त्यांनाच माझे विरुद्ध बारामती शहरात मोठा मोर्चा काढायला लावला. हा पराक्रम पवार घराण्यातील अजित पवार यांनी घडवून आणला. आपणच लोकशाहीतील टगे आहोत हे सिद्ध केले.
वरील सर्वजण मानसिक दृष्ट्या गुलाम असलेल्या समाजाचे घराणे शाहीतून तयार केलेले नेते आहेत.
देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, मोहन भागवत, सनातन संस्थेचे आठवले,…… यांची कपाटे तपासली तर त्यामध्ये दाभोळकर, पानसरे यांच्या सारख्यांच्या विचारांची प्रातिनिधिक हाडे व कवट्या सापडतील.
यांच्याच पूर्वजांच्या घरातील कपाटे तपासली तर त्यात तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव,…., यांच्या विचारांची प्रातिनिधिक हाडे व कवट्या सापडतील. इथल्या सर्व मूळ निवासींना सरसकट शूद्र ठरवून त्यांचे केलेले शोषण याचे असंख्य दस्त आइवज यांच्या घराघरात सापडतील.
लोकांच्यासाठी ,लोकांच्याकडून आणि लोकांची असलेली म्हणजे ती लोकशाही. तिचे रूपांतर आमच्याच डोळ्या देखत घराण्यासाठी, घराण्यांच्याकडून व घराण्यांच्या मालकीची म्हणजे लोकशाही अशी बनली!
आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मालक जमातीने मुंडे,पवार सह सर्व गुलाम जमातीच्या घराण्यांना आपल्या पालखीचे भोई बनविले हे दिसून येते. ते तसे
भोई का बनले?
याचा यथावकाश शोध घेऊ या.
-सुरेश खोपडे