नांदेड – परभणी आणि बोंढार येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ठोका आणि पोलीस निरीक्षक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करा या मागणीसाठी येत्या 20 जानेवारी रोजी नांदेड मध्ये संविधान समर्थन महामोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज नरसी, नायगाव आणि मुखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाला.
आज दिनांक १७ रोजी नायगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे, माधवदादा जमदाडे, राहुल चिखलीकर,अनिल सिरसे मधुकर झगडे, अश्विन गर्दनमारे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे आयोजन नागसेन जिगळेकर यांनी केले होते.
यावेळी साईनाथ जिगळेकर , भास्कर भेदेकर , नागसेन जिगळेकर , रोहन सोनकांबळे ,देविदास सुर्यवंशी ,कपिल भेदेकर, किरण इंगळे , कपिल भद्रे , राहुल गायकवाड , विकास सोडारे , गौतम गावंडे अंजनीकर , सुमित वाघमारे , गंगाधर इबितकर , आदींची उपस्थिती होती.
नरसी येथील बैठकीनंतर प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात मुखेड येथेही बैठक पार पडली. मुखेड येथील बैठकीचे आयोजन अनिल सिरसे यांनी केले होते या वेळी सिद्धार्थ कांबळे , अश्विन गर्दनमारे, आशिष भारदे ,आकाश कांबळे ,श्रावण नरबागे,विजय बनसोडे,भीमराव नागमोडे चोंडीकर, संजय सोनकांबळे, संपत कुंभारे, संजय गवळे,किशोर लोहबंदे, पप्पू सोनकांबळे, सुनील बनसोडे,संदीप लोहाळे,संतोष सिरसे ,राहुल गायकवाड हिब्बटकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
20 जानेवारी रोजी होणाऱ्या संविधान समर्थन महामोर्चात नायगाव आणि मुखेड तालुक्यातील मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहतील असा विश्वास आयोजित बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी दिला.