नांदेड -भांडीरवन, द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी 2025 रोजी श्री यादव अहिर गवळी समाज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.
सदर मेळाव्यात 28 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत, महाराष्ट्र , तेलंगणा आणि मध्यप्रदेश येथील 42 गावात पसलेला यादव अहिर गवळी समाज हजारोच्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष अर्जुन किशनलाल कुटल्यवाले यांनी दिली.
तत्पूर्वी आज 17 रोजी सामूहिक विवाह सोहळा समितीच्या वतीने महामाई माता मंदिर, देवी नगर, नांदेड येथे वधू-वरांच्या निमंत्रण पत्रिकेचे पूजन करण्यात आले येथून संपूर्ण अहिरातीत 42 गावात सदर पत्रिका वितरित होणार आहे
मागील 26 वर्षांपासून नांदेड यादव समाज सामूहिक विवाह उपक्रम चालवीत आहे1999 पासून ते आजपर्यंत 850 जोडपी या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाहबद्ध झाले आहेत. कोणत्याही राजकीय आणि व्यक्तिगत देणगी न स्विकारता फक्त वर- वधू कडून प्राप्त नाममात्र देणगी वर अंत्यल्प खर्चात सदर सामूहिक विवाह समारोह सर्व परंपरागत पद्धती , नीती नियमांचे पालन करून केले जाते. अशी माहिती गणेशलाल भातावाले व प्रेमलाल जाफराबादी यांनी दिली.
या प्रसंगी समाजाचे चौधरी शरद मंडले ,धन्नूलाल भगत, दुर्गाप्रसाद बटाऊवाले, भारत राऊत्रे, राजेश बटाऊवाले, पवन गुरखुद्दे, राजू लंकाढाई, पूनमचंद लंकाढाई, गिरीश भातावाले, सुंदरलाल भातावाले, दिनेश भातावाले,अर्जुनलाल लंकाढाई,पवन कुटल्यवाले, भिक्कालाल मंडले, दिनेश परीवाले , तुलसी मंडले, आनंद परीवाले , मनोज राऊत्रे, डॉ. कैलाश मंडले तसेच समाजातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.