नांदेड , (प्रतिनिधी)- प्रभातनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुभद्राबाई पंडितराव सावंत यांचे आज दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. उद्या दि. १८ जानेवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत दिवंगत सुभद्राबाई पंडितराव सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत आणि उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक सावंत यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत सुभद्राबाई सावंत यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
विष्णूपुरी धरणाचे १० गेट उघडले
नांदेड-जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह…
हलके मोटार वाहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी एमएच 26-सीपी नविन मालिका
नांदेड:- परिवहन्नेतर संवर्गातील हलके मोटार वाहन (LMV-NT) वाहनांसाठी एमएच26-सीपी (MH26-CPG) ही नविन मालिका सोमवार 22…
राज्यस्तर सिनीअर ( वरिष्ठ गट) धनुर्वीद्या स्पर्धसाठी निवड चाचणीचे आयोजन
सचिव वृषाली जोगदंड यांची माहिती नांदेड –महाराष्ट्र धनुर्वीद्या संघटनेच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा संघटनेच्या वतिने आयोजीत…
