नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून शहरातील श्रीसंत गजानन महाज मंदिर तरोडा मालेगाव रोड नांदेड येेथे दि.12 जानेवारी रोजी श्री.गजानन विजय गं्रथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते.
शहरातील तरोडा परिसरात असणाऱ्या श्री गजानन महाराज मंदिर येथे दि.12 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 2 या वेळात 75 भक्तांनी या पारायणात सहभाग घेवून यामध्ये आध्याय 1 अध्याय 21 श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले. यानंतर आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला.