संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी 17 जानेवारी रोजी नायगाव आणि मुखेडमध्ये बैठक 

नांदेड : परभणी आणि बोंढार येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ठोका आणि पोलीस निरीक्षक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करा या मागणीसाठी येत्या 20 जानेवारी रोजी नांदेड मध्ये संविधान समर्थन महामोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी उद्या दिनांक 17 जानेवारी रोजी नायगाव आणि मुखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .

शुक्रवार दिनांक १७ रोजी शासकीय विश्रामगृह नायगाव येथे दुपारी बारा वाजता पार पडणाऱ्या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश्वर पालमकर , माधव दादा जमदाडे , राहुल चिखलीकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीचे आयोजन नागसेन जिगळेकर यांनी केले आहे. नायगाव येथे पार पडणाऱ्या बैठकीस नायगाव , नरसी आणि बिलोली येथील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत . नायगाव येथील बैठक आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजता मुखेड येथे अनिल शिरसे यांच्या आयोजनात २० रोजी पार पडणाऱ्या मोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे .

या बैठकीला ही प्रा. राजू सोनसळे यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली असून आंबेडकरी चळवळीतील जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नायगाव आणि मुखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन नागसेन जिगळेकर आणि अनिल शिरसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!