आता काही दिवसात भारत देशाच्या सुरक्षेचा ठेका सुध्दा गौतम अडाणीला दिला जाईल काय? अशी परिस्थिती तयार झाली आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली अडाणी डिफेन्स या कंपनीला गुप्त चरण ड्रोन बनविण्यास सांगितले आणि पहिल्याच परिक्षणात या ड्रोनची हवा निघून गेली, ड्रोन खाली पडले. त्यामुळे त्यात ज्या तांत्रिक गोष्टी असायला हव्या होत्या त्या नव्हत्या असाच त्याचा अर्थ होतो. ड्रोन पडल्यानंतर भारतीय नौसेनेच्या नावाने प्रसिध्दी पत्रक काढून सेनेचे काही नुकसान झाले नाही अशी सारवा-सारव केली जात आहे.
गौतम अडणीने अडाणी डिफेन्स नावाची कंपनी तयार केली आणि नरेंद्र मोदी यांच्या आग्राहखातर इजराईलच्या एका खाजगी कंपनीने अडाणी डिफेन्ससोबत संयुक्तपणे हेरगिरी करणारे ड्रोन बनविले. या एका ड्रोनची किंमत 140 कोटी रुपये आहे. शासकीय दस्तावेजानुसार ते खरेदी करण्यात आले आणि त्याचे पहिले परिक्षण होत असतांनाच ते ड्रोन कोेसळले आणि उध्वस्त झाले. त्यानंतर नौसेनेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रमाणे एक बातमी प्रसिध्द करण्यात आली. ज्यामध्ये विकणाऱ्याने ते उध्वस्त झालेले ड्रोन परत घेतले आहे. त्यामुळे सेनेेचे काही नुकसान झाले नाही असे ती बातमी सांगते. भारताच्या सुरक्षेशी संबंधीत ड्रोन खरेदी करण्यात आले, ते पडले आणि त्यानंतर त्याचा खुलासा देण्यात आला. अडाणी डिफेन्सला सुरक्षेतील उपकरणे बनविण्याचे काय अनुभव आहे याचा थांग पत्ता कोणालाच नाही.
अमेरिका, केनिया, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश या देशांमध्ये अडाणीविरुध्द त्यांच्या व्यवसायाशी संबंधीत आवाज गुंजू लागला आहे. अमेरिकेने तर फौजदारी खटलाच दाखल केला आहे. तसेच दिवाणी दावे सुध्दा दाखल केले आहेत. याचा अर्थ नरेेंेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे अडाणीला व्यवसाय मिळतो. पैसा सुध्दा भारत सरकार देते, लाखो कोटी रुपये त्यांचे कर्ज माफ होते. याचा अर्थ भारताच्या प्रशासनात त्यांचा वचक वाढत चालला आहे. काही दिवसांनी हा वचक हुकूमशाही तयार करेल अशी भिती वाटायला लागली आहे. रफेल विमानांच्या किंमती संदर्भाने सुध्दा खुप बोभाटा झाला. परंतू त्याचा कोणताही निर्णय अद्याप आला नाही. हा भाग तर सोडाच पुलवामा येथे सहावर्षापुर्वी झालेल्या हल्यात भारतीय सैनिकांची मोठी फौज शहीद झाली होती. आजही त्या पुलवामा हल्ला चौकशीचा निकाल आला नपाही. त्यावेळेस मात्र तो पुलवामा हल्ला सत्ताधारी पक्षाला मतदानाची टक्केवारी सुध्दा वाढवून गेला हे सुध्दा सत्यच आहे.
डिफेन्समध्ये कोणताही अनुभव नसणाऱ्या अडाणी ग्रुपने काही दिवसांपुर्वीच अडाणी डिफेन्स ही कंपनी बनवावी आणि त्यांच्यावतीने ड्रोन खरेदी व्हावे. ते सुध्दा मेक इन इंडियाचे नाहीत तर इजराईल येथील खाजगी कंपनीच्या मदतीने बनविले आहे. 140 कोटी रुपयांचे नुकसान झाले असतांना विक्री करणाऱ्याने ते परत घेतले. असे म्हणून सेनेचे काही नुकसान झाले नाही अशी बातमी नौसेनेच्या सुत्रांनी दिल्याची बातमी प्रसिध्द करण्यात आली. भारताच्या डीआरडीओला ड्रोन बनविण्याचे काम का दिले नाही. या प्रश्नाचे उत्तर कोण देईल. भारताच्या डिआरडीओने एकदा मंगळ यान ध्वस्त झाल्यानंतर काही दिवसातच पुन्हा तयारी करून मंगळयाण साऊथ पोलवर उतरवून दाखविले होते. जगात असे करणारा भारत हा पहिला देश आहे. इतर कोणत्याही देशाला यश आलेले नाही. पण दुर्देव डीआरडीओवर केंद्र सरकारने भरवसा दाखवला नाही. भविष्यात मोदी सरकार पुढे कधी तरी भारत देशाची सुरक्षा करण्याचा ठेकाच अडाणीला देवून टाकेल अशी शंका घ्यायला कारण आहे. किती भारी होईल ना की, भारतीय सेनेच्या तिन गटांचे प्रमुख थलसेना प्रमुख, वायूसेना प्रमुख आणि नौदल प्रमुख अडाणीला रिपोर्ट करतील हे भारताचे भविष्य आज दिसत आहे.