नांदेड(प्रतिनिधी)-बारड येथील एक बिअरबार फोडून चोरट्यांनी 1 लाख 79 हजार 980 रुपयांची दारु चोरली आहे.
बार चालक उत्तम शंकरराव भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारड ता .मुदखेड येथे त्यांच्या मालकीचे मैत्री बार ऍन्ड रेस्टॉरंट आहे. 12 जानेवारीच्या रात्री 11 वाजता त्यांनी आपले बार नियमितपणे बंद केले आणि 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता बार उघडायला आले असता बारच्या कडीकोंड्याला लावलेले कुलूप तुटलेले होते. तपासणी केली असता बारमधून देशी आणि विदेशी दारुच्या बॉटल्या आणि बॉक्स असा एकूण 1 लाख 79 हजार 980 रुपयांचा दारुचा साठा कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला होता. बारड पोलीसांनी दारु चोरीची घटना गुन्हा क्रमांक 4/2025 प्रमाणे दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे अधिक तपास करीत आहेत.