प्रश्न विचारणारे खासदार, प्रसारमाध्यमे आणि न्याय व्यवस्था झोपली आहे
भारताच्या अर्थ व्यवस्थेमध्ये नोटबंदी ही सर्वात मोठी चुक होती. त्यानंतर जीएसटी आणि कोविड यामध्ये झालेल्या चुकांच्या परिणामात भारताची अर्थवस्था मागील दहा वर्षामध्ये ज्या पध्दतीने खाली पडली. ती परत वर आलीच नाही. प्रगतीचा दर 8 टक्यावरून आज 4.5 टक्केपर्यंत घसरला आहे. हा सर्व प्रकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व काही कळते, सर्व काही येते, मीच करू शकतो या भावनेतून झाले असल्याचे मत भारताचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
अगोदर भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी.नंतर राजकारणात प्रवेश, विदेशमंत्री, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात दोन वेळा अर्थमंत्री अशी पदे भुषविणारे एक अर्थशास्त्री यशवंत सिन्हा यांनी दिलेली मुलाखत भरपूर काही सांगते. भारताच्या अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी चुक नोटबंदी होती असे सिन्हा सांगतात. त्यानंतर लादण्यात आलेला विविध स्तरांवरील जीएसटी कर आणि त्यानंतर आलेला कोविड आणि त्यात घेतलेल्या निर्णयातील चुका या भारतीय अर्थवस्थेला एका खोल दरीत फेकले गेले आहे. नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणुस लाईनमध्ये मरण पावला. त्याची गरज काय होती, त्यातून काळे धन समोर येईल आशा सुध्दा चुकलेली आहे. त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. जीएसटीचे विविध स्तर तयार करण्यात आल्यामुळे भारतीय व्यापाराची कंबर मोडली गेली. त्यानंतर कोविड या त्रासाला निपटण्यासाठी घेण्यात आलेले अनेक निर्णय असे आहेत की, ज्यामुळे भारतीय अर्थ व्यवस्था पुर्णपणे खाईत फेकली गेली. मी वित्तमंत्री असतांना राज्य उत्पादन शुल्काचे दर तीन स्तरांमध्ये तयार करण्यात आले होते. जीएसटीचे पण तसेच व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही म्हणून आजची भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत खालच्या स्तरावर आली आहे.
मोदी सांगत होते की, भारतीय अर्थव्यवस्था काही वर्षांमध्ये 5 ट्रीलियनची होईल अर्थात आम्ही अमेरिका आणि चिननंतर जगात तिसऱ्या क्रमांकाचे असू ही त्यांची वल्गनाच होती. कारण एका ट्रिलियनमध्ये किती शुन्य लावले जातात हे भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही. ही बाब स्पष्ट करतांना यशवंत सिन्हा म्हणाले की, एका ट्रिलियनवर 12 शुन्य लावले जातात. कशी होणार ट्रिलियनमध्ये तुमची अर्थव्यवस्था कारण नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर कसा मजबुत होतो आहे हे सांगतांना बोलत होते की, मी हे सर्व बरोबर करेल. भारताचा रुपया अमेरिकेच्या डॉलरपेक्षा मोठा करून दाखवेल मग आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 86.67 झाली आहे. तरी मोदी गप्प का आहेत? असा प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित केला. गुजरात या छोट्याशा राज्याचा अनुभव त्यांच्याकडे होता. परंतू भारतीय संसदेत हे त्यांना जमले नाही. भारताचा व्याप मोठा आहे आणि तो व्याप सांभाळत असतांना त्यासाठी असावी लागणारी जिद्द त्यांच्याकडे नव्हती. मोदींनी जनतेला स्वप्न दाखवले आणि त्या स्वप्नांवर विश्र्वास करून जनतेने त्यांना सत्ता दिली. पण ती स्वप्न पुर्ण होणे तर दुरच आजही नरेंद्र मोदी जनतेला स्वप्नच दाखवत असतात. या प्रश्नांना विचारण्यासाठी तीन जागा आहेत. भारतीय संसद, प्रसार माध्यमे आणि न्याय व्यवस्था या तिन्ही संस्था आज झोपल्या आहेत असे सिन्हा यांचे मत आहे. सरकार जे सांगते. तेच बरोबर आहे असे बोलल्याशिवाय पर्याय नाही म्हणून या तिन संस्था झोपल्या आहेत. भारतात आज कोणी कौटील्य(अर्थशास्त्रीक) नाही काय? या प्रश्नावर बोलतांना सिन्हा म्हणाले भारतात कौटील्यांची भरमार आहे. परंतू त्यांना विचारणार कोण? यावर तुम्हाला विचारण्यात आले की, नाही या प्रतिप्रश्नावर चिन्हा म्हणाले नरेंद्र मोदी आणि माझे संबंध हे मधुर नाहीत. म्हणून भारताच्या कोणत्याही मंत्र्याची मला विचारणा करून काही निर्णय घेण्याची हिम्मत कशी असेल.
कोणत्या धोरणांमुळे मोदी सरकार बॅकफुटवर आहे. यावर बोलतांना सिन्हा म्हणाले, योजनांचा चुकीचा फायदा कोणी घेणार नाही, सरकार जे पैसे खर्च करत आहे. त्यात भ्रष्टाचार होणार नाही अशी सोय असली तर प्रत्येक योजना यशस्वीच ठरते. याचे उदाहरण देतांना सिन्हा म्हणाले अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असतांना पंतप्रधान ग्राम सडक योजना तयार करण्यात आली होती. त्या योजनेत तयार झालेले रस्ते आजही उत्कृष्ट पध्दतीत आहेत. याचे कारण स्पष्ट करतांना सिन्हा म्हणाले त्या रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी जी पध्दत होती. त्या पध्दतीनुसार छत्तीसगडमध्ये तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची गुणवत्ता तपाण्यासाठी तामिळनाडूचे अभियंता येत होते आणि म्हणून त्यात काही चुकीचा अहवाल कधीच आला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी लाखो शौचालय बनवले हे सार्वजनिक भाषणांमध्ये आवर्जुन सांगतात. परंतू आज त्यांची अवस्था काय आहे हे कोणी पाहिले नाही. कारण ज्या ठिकाणी शौचालय तयार करण्यात आले. त्या ठिकाणी मलनिस्सारणाची सोय नाही, पाण्याची सोय नाही मग त्या शौचालयांचा उपयोग काय? या शौचालयाच्या योजनांची ऑडीट सीएजी का करत नाहीत असा प्रश्न सिन्हा यांनी उपस्थितीत केला. अटलबिहारी वाजपेयीच्या काळात मंत्री मंडळ, प्रशासकीय अधिकारी, खासदार इतर मंत्री यांच्यासोबत चर्चा करून एखादी योजना लागू व्हायची आणि त्यासाठी आम्ही सर्व जण जबाबदार असायचो आज असे घडत नाही. म्हणूनच भारताची किंमत जगात खालीखालीच चालली आहे आणि अशाच पध्दतीच्या कामकाजामुळे दहा वर्षात खाली पडलेली अर्थव्यवस्था पुर्वपदावर आलीच नाही.
सन 2014 च्या निवडणुकीमध्ये अडाणीच्या विमानात बसून नरेंद्र मोदी यांनी आपला निवडणुक प्रचार पुर्ण केला होता. आजपर्यंत कोणीच याबाबत विचारणा केली नाही की, या विमानाचे भाडे किती झाले होते आणि ते भाडे कोणी अदा केले होते. या असल्या प्रकारामुळे अडाणीचा भाव वाढला आणि तो प्रशासनाच्या कामात सुध्दा आपला प्रभाव दाखवू लागला. का अडणीला असे मिळत आहे याचे उत्तर देतांना सिन्हा म्हणाले ते एटीएम आहे आणि एटीएमचा उपयोग कसा होतो हे सांगण्याची गरज नाही. आज भारताचा डंका जगात वाजतो आहे असे सांगणारी प्रसार माध्यमे किती थोतांड आहेत हे दिसते. मी सन 2004 मध्ये एकदा अमेरिकेला गेलो होतो. त्यावेळी माझ्या सर्व बैठका तेथील अर्थमंंत्र्यांसोबत होत्या . परंतू अचानकच मला सांगण्यात आले की, उद्या सकाळी 9 वाजता आपल्याला व्हाईट हाऊसचे निमंत्रण आले आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्जबुश आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. या घटनेला कोणत्याही प्रसार माध्यमाने भारताचा डंका अमेरिकेत वाजला असे प्रसारीत केले नव्हते. सोबतच 6 दिवस अमेरिकेत राहून विदेश मंत्री भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रण मिळावे यासाठी झ्रटपटत होते. ते म्हणजे आपल्या हातात भिकेची वाटी घेवून फिरत होते असा उल्लेख सिन्हा यांनी केला.
खा.राहुल गांधी हे अमेरिकेत बसून सिख समाजाबद्दल काय बोलले त्या वाक्यांना तोडून-मोडून दाखवत त्यांच्याविरुध्द गरळ ओकणारी भारताची प्रसार माध्यमे संसदेतच्या अमित शाहच्या भाषणातील डॉ.आंबेडकरांच्या उल्लेखाला लपविण्याचा प्रयत्न करतात. जगातल्या कोणत्याही भाषेच्या विद्वानाला अमित शाहचे वाक्य ऐकवले तर तो नक्कीच त्यांच्याविरुध्द आपले मत देईल. पण पंतप्रधानांना निमंत्रण नाही, भारताची अर्थव्यवस्था खाली आली आहे, भारताचा उन्नती दर घसरला आहे. या सर्व बाबतीत सीएजीने कधीच ऑडीट केले नाही. यावर चर्चा करायला भारतीय प्रसार माध्यमांमध्ये हिम्मत नाही असेच म्हणावे लागेल.