अहो,आश्चर्यम…जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागात तब्बल 440 दिव्यांग शिक्षक कर्मचारी, यातील बोगस दिव्यांग कर्मचारी किती..? 

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांचा प्रशासनाला सवाल..!

नांदेड( प्रतिनिधी)- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात असलेल्या दिव्यांग शिक्षकांची फेरतपासणी करून बोगस दिव्यांग शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपले सरकार पोर्टलवर दि. 21/2023 Dist/ZPNN/2023/3162 आणि दि. 27/2023 Dist/ZPNN/2023/3076 यासह दि.27/2023 Dist/ZPNN/2023/3076 अन्वये तक्रार दाखल करून माहिती मागितली होती.तेंव्हा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी दि.20 जुन 2024 रोजी जा.क्रं./जिपनां/शिअप्रा/प्रा-1 बंद/4326/2024 मध्ये म्हटले होते की सदर शिक्षकांची तपासणी करणे बाबत अधिष्ठाता जे.जे.मेडिकल काॅलेज,नागपाडा,मुंबई यांना कार्यालयाचे पत्र जाक्रं/जिपना/शि.अ.प्रा./प्रा-1 ब/4096 दिनांक 23 जुन 2023 नुसार पत्र दिल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी पत्राद्वारे कळविले होते. परंतु वर्ष उलटले तरी कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर फेरतक्रार दाखल केली तेंव्हा जिल्हा परिषद जालना प्राथमिक शिक्षण विभागातील 170 दिव्यांग शिक्षकांच्या नावांची यादी अधिष्ठाता जे.जे.मेडिकल काॅलेज, नागपाडा मुंबई यांना पाठविल्याचे दाखवत तक्रारदार राहुल साळवे यांची व शासनाची दिशाभूल केली त्यामुळे राहुल साळवे यांनी या सर्व प्रकरणाच्या निषेधार्थ दि 26 जानेवारी रोजी गणराज्य दिनी आणि 27 जानेवारी 2025 रोजी दोन दिवसीय तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात शेकडो दिव्यांगांसह करणार असल्याचे अपीलय तक्रार दाखल करताच प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी जाक्रं/शिअप्र/जिपनां/प्रा.1-अ/257/2025 मध्ये म्हटले आहे की, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत एकूण 440 दिव्यांग शिक्षक संवर्गीय कर्मचारी कार्यरत असल्याचे म्हटले आहे, त्यापैकी जवळपास सर्व कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करून त्यांना बदली, पदोन्नती व इतर अणुषंगीक लाभ देय करण्यात आले असल्याचे म्हटले आहे तसेच बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांना या 440 दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी व ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र न देता ज्यांच्यावर शंका असेल त्यांची नावे कार्यालयासह कळविण्याबाबत अकलेचे तारे तोडत आपल्या पदाचा दुरुपयोग शिक्षणाधिकारी हे करीत असल्याचे साळवे म्हणाले कारण या 440 दिव्यांग शिक्षकांमध्ये भरपुर बोगस दिव्यांग शिक्षक आहेत आणि हे प्रत्यक्ष शिक्षणाधिकारी यांनी आपल्या वरिष्ठांसमक्षच तपासणी करून सिद्ध करण्याऐवजी एक प्रकारे बोगस दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप करत बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी त्वरित बोगस दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करा अन्यथा गणराज्य दिनी दोन दिवसीय तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!