नांदेड(प्रतिनिधी)-संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समितीच्यावातीने विभागीय क्रिडा स्पर्धाचे बक्षीस वितरण नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील पाच दिवसांपासून संचालनालय लेखा व कोषागारे यांच्या कल्याण समितीच्यावतीने विभागीय क्रिडा स्पर्धा-2025 नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या संकुलात संपन्न झाले. या स्पर्धांमध्ये अनेक क्रिडा प्रकारांचा समावेश होता. त्यात विजेत्या खेळाडूंना आज नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी सेवानिवृत्त सहसंचालक उत्तम सोनकांबळे, पी.आर.कदम, लेखाधिकारी जनार्धन पकवाने, उपसंचालक शेखर कुलकर्णी, माडे, श्रीमती महाले, जिल्हा कोषागार अधिकारी अलंकृता बगाटे, बापू दासरी यंाची उपस्थिती होती.