स्थानिक गुन्हा शाखेने चार अग्नीशस्त्र आणि तीन जिवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात त्यांचे दबंग सहकारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चार युवकांना पकडून त्यांच्याकडून चार अग्नीशस्त्र(पिस्टल) आणि तीन जीवंत काडतूस पकडले आहेत.
दि.9 जानेवारी रोजी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, मिलिंद नरबाग, चंद्रकांत स्वामी, राहुल लाठकर, तिरुपती तेलंग, सिध्दार्थ जोंधळे, राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी आलम गबरु शेख (20) रा.धानोरा ता.लोहा जि.नांदेड यास ताब्यात घेतले. तो पिस्टल विक्री करत होता. त्याच्यासोबत पोलीसांनी विजय प्रकाश बोईनवाड (21) सरस्वतीनगरजवळ धर्माबाद, सुरज शेषराव वंजारे(21) रा.पिंपळकौठा (मगरे) ता.मुदखेड जि.नांदेड, विजय भास्कर कंधारे (23) रा.सामगा ता.हिंगोली यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. यांच्याकडे एकूण 4 अग्नीशस्त्र(पिस्टल) आणि 3 जिवंत काडतुसे सापडली. याबद्दल नांदेड ग्रामीण व लोहा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!