नांदेड :- स्वयं सहायता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये मल्टीपर्पज हायस्कुल वजिराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या भव्य विक्री प्रदर्शनाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जि. ग्रा वि.यं., जि. प. नांदेड यांच्यामार्फत आयोजित या विक्री प्रदर्शनामध्ये नांदेड जिल्हातील स्वयंसहायता समुहातील महिलासह अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर, परभणी, अहिल्यानगर, हिंगोली इ जिल्हातील उत्कृष्ट उत्पादने घेऊन महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनाला नांदेडकराचा उस्फुर्त सहभाग मिळत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली या मिनी सरसचे आयोजन करण्यात आले आहे.
मिनी सरस विक्री प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, सर्व जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी प्रयत्न केले आहेत.