नांदेड- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू आहे. 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत हा उद्देश पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख ह्या माहे जुलै -2024 मध्ये रुजू झाल्यापासून यांच्या नियोजनामुळे विविध उपक्रम राबवले जात आहेत. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणी दरमहा 9 तारखेला गरोदर माता यांची तपासणीचे प्रमाणात वाढ झाली, तसेच पोषण आहारचे प्रमाण वाढले, प्रा आ केंद्र व उपकेंद्र ठिकाणी प्रसूतीचे प्रमाणात वाढ झाली, स्तनदा माता यांच्या सेवेमध्ये वाढ झाली, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मध्ये सुद्धा वाढ झाली व इतर आरोग्य सुविधा सुद्धा सुधारणा झाली. डॉ संगीता देशमुख ह्या रुजू झाले तेव्हा नांदेड जिल्हा 33,34,35 व्या रँकिंग वर होता चार महिन्यात 10 व्या रँकिंग वर आला व आता पहिल्या रँकिंग मध्ये आला आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या शंभर दिवसीय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम ही राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनाच्या विस्तृत फ्रेमवर्कचा एक भाग आहे. जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहेत मोहिमेची मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट चांगल्या प्रकारे पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रयत्नाचे फळ मिळताना दिसत आहे.
आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे नांदेड जिल्हा क्षयरोग रँकिंग मध्ये महाराष्ट्रात पहिला आला आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी रँकिंग मध्ये भारतात दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कौतुक होत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतिश कोपुरवाड यांचे नियोजन व कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग, तळागाळातील जनतेपर्यंत मोहिमेची जनजागृती केली जात आहे. संशयित क्षय रुग्णांचे सर्वेक्षण करणे, संपूर्ण तपासण्या,औषध उपचार करणे, त्यांच्या आहारावर विशेष लक्ष देणे, फूडकिट देणे. यामुळे कार्यक्रमाला चांगला वाव मिळत आहे. निक्षय व्हॅन म्हणजे फिरते वाहन या गाडीद्वारे फिरून सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले.