खा.प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री आतिशीसिंह यांच्या बेअब्रुला डॉगी मिडीयाने दाबून टाकले

आम्ही मात्र कोणाच्या ताटाखालचे मांजर नाहीत
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने कालकाजी या विधानसभा मतदार संघातून रमेश विधुडी यांना उमेदवार केले आहे. या विधानसभा मतदार संघात कॉंगे्रसच्या अलका लांबा आणि आम आदमी पार्टीच्या आणि सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असलेल्या आतिशीसिंह या सुध्दा निवडणुक लढविणार आहेत. विधानसभेचा उमेदवार झाल्याबरोबर 24 तासातच रमेश विधुडी यांनी दिलेल्या सार्वजनिक वक्तव्यावर कोणीही पत्रकार, मिडिया, प्रसार माध्यमे, वृत्तवाहिन्या रमेश विधुडीच्या वक्तव्यावर काहीच बोलत नाही. इतर वेळेस एखाद्या विधानाची मोडतोड करून त्यावर डिबेट घडविणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी या संदर्भाने गिळलेले मुग धक्कादायक आहे. या प्रकरणाला आम्ही आज मांडत आहोत. त्यातून आम्ही कोणाच्या ताटाखालचे मांजर नाही हेच दाखवायचे आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये कालकाजी मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश विधुडी हे पुर्वी खासदार सुध्दा होते. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकिट मिळाले नव्हते. मागच्या लोकसभेत खासदार असलेल्या रमेश विधुडी यांनी आपल्या सहकारी समाजवादी पक्षाच्या खासदार दानिश अली यांचा लोकसभेच्या सभागृहात केलेला र्दुव्यवहार गाजला होता. दानिश अली यांच्या संदर्भाने आणि त्यांच्या समाजाच्या संदर्भाने रमेश विधुडी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खालच्या स्तराचे होते आणि ते बोलत असतांना इतर भारतीय जनता पार्टीचे खासदार हसत होते. त्यांच्या लोकसभेतील वक्तव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना वरचे स्थान मिळाले. तेच बोलतात असे नाही. तर असे अनंत नेते भारतीय जनता पार्टीकडे आहेत. जे खालच्या स्तरावर बोलतात. खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा लोकसभा निवडणुकीमध्ये विधवा, मुजरा, तुमच्या मुली घेवून जातील, मंगळसुत्र घेवून जातील असे शब्द वापरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये बोलण्याचा स्तर किती खालच्या स्तराचा आहे हे दिसते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतर रमेश विधुडी यांनी एका सार्वजनिक भाषणात बोलतांना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशीसिंह यांच्याबद्दल सांगितले की यांनी आपला बाप बदलला आहे. तसेच लालु प्रसाद यादव यांचा जुना संदर्भ सांगून त्यांनी जनतेसमोर सांगितले की, कालकाजी विधानसभा मतदार संघातील रस्ते मी खासदार प्रियंका गांधी यांच्या गालासारखे करून देईल. हे स्पष्ट करतांना त्यांनी लालु प्रसाद यादव यांचा उल्लेख केला होता. लालुप्रसाद यादव यांनी सुध्दा बिहारचे रस्ते मी हेमामालीनी यांच्या गालासारखे करून देईल असे सांगितले होते हा ईतिहास आहे. मुळात लालुप्रसाद यादव यांनी वापरलेले वाक्य सुध्दा अत्यंत खालच्या स्तराचे आहे आणि रमेश विधुडींचे वाक्य सुध्दा खालच्या स्तराचे आहे. याचे समर्थन होवूच शकत नाही. काही गोदी पत्रकारांनी रमेश विधुडीला कॉंगे्रस माफी मागायला सांगत आहे अशी विचारणा केली तेंव्हा मी काहीच चुकीचे बोललो नाही. आज कॉंगे्रस लालु प्रसाद यादव सोबत गट्टी करून आहेत. मग त्यांच्या वक्तव्यावर ते काय म्हणणार. त्यावर त्या गोदी मिडीयाने प्रियंका गांधी, आतिशीसिंह यांच्या बोलण्यावर वृत्त, विश्लेषण, डिबेट न करता रमेश विधुडी यांनी काहीच चुकीचे केले नाही हहे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुन आज पत्रकार दिनी आम्हाला वाटले की, कमीत कमी आपण तर महिलांच्या झालेल्या या बेअब्रुबद्दल लिहिले पाहिजे. म्हणूनच हा प्रयत्न केलेला आहे. अर्वाचीन भारताच्या ईतिहासात सुध्दा महिलांचा सन्मान कसा व्हावा. याची अनेक उदाहरणे आहेत. पण आज कलयुगात हा प्रकार विरत चालला आहे. आज महिला म्हणजे खेळण्याचे एक साधन झाले आहे असे म्हटले जाते. म्हणूनच माझ्या वडीलांनी मला कधी बाहुलीसोबत खेळू दिले नाही. कारण महिला या खेळण्यासाठी नाहीत तर त्या सन्मान करण्यासाठीच आहेत. रमेश विधुडी सारखे शब्द कोण्या कॉंगे्रस नेत्याने वापरले असते तर आतापर्यंत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असतो, महिला आयोगाने ओरड केली असती. पण असे काही घडले नाही. दुर्देव असे आहे की, लोकशाहीतील चौथास्तंभ म्हणून पत्रकारीतेचा उल्लेख केला जातो. त्या पत्रकारांनी सुध्दा एवढ्या मोठ्या घटनेला दाबून ठेवले आहे. यापेक्षा दुर्देव ते काय? पण आम्हाला असे दुर्देवी व्हायचे नाही आणि डॉगी मिडीया बनायचे नाही म्हणूनच आम्ही प्रियंका गांधी आणि आतिशीसिंह यांच्या बेअब्रु बद्दल बोलत आहोत.
नवी दिल्ली मतदार संघातून आप पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द प्रवेश वर्मा नावाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. 15 वर्षापुर्वीच्या कालखंडात दिल्लीचे मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा हे होते. प्रवेश वर्मा हे त्यांचे पुत्र आहेत. ते सुध्दा रमेश विधुडीसारखे बोलतात असे त्यांची ख्याती आहे. पण त्यांच्या वडीलांचा विचार केला तर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या डीटीसी बसमधून स्वत:च्या घरी गेले होते. अशा एका नामवंत पित्याचा पुत्र प्रवेश वर्मा सुध्दा खालच्या स्तरावर बोलण्यासाठी प्रसिध्द झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रापती जोबायडन यांच्या पत्नीला 20 हजार डॉलर किंमतीचा हिरा भेट दिला होता. त्याची भारतीय रुपयांमध्ये किंंमत 17 लाख रुपये होते. यापुर्वी ट्रम्प हे राष्ट्रअध्यक्ष असतांना त्यांच्या कुटूंबियांना सुध्दा पंतप्रधान मोदी यांनी जवळपास 50 हजार डॉलरच्या भेट वस्तु दिल्या होत्या. ही माहिती आरटीआयमधून पुढे आली आहे. याबद्दल सुध्दा डॉगी मिडीया काही बोलत नाही आणि आम्ही किती हुशार आहोत हे दाखविण्यात आपला वेळ घालवितात. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी डिबेट घडवून आमचे लोकशाहीवर कसे लक्ष आहे हे दाखविण्याचा होणारा प्रयत्न किती खोटारडा आहे हे दिसते. सध्या कॅगकडून सुध्दा आलेल्या अहवालात बऱ्याच खर्चांसाठी केंद्र सरकारवर आरोप करण्यात आले आहेत. त्याबद्दल मिडीया काही बोलत नाही. नाही तर या पुर्वी कॅगने लिहिलेले एक वाक्य पान भरुन लिहिण्याची प्रसार माध्यमांची सवय कोठे गेली हे समजत नाही. अशा प्रकारे मिडीयाचे स्तर खाली गेले आहे. म्हणूनच नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी लिहिलेली पत्रकार दिनानिमित्तची कविता बोलकी आहे.
सत्यनिष्ठा, सचोटीचे
झाले आहे विस्मरण
पत्रकार बंधूंनो, करु या
आज थोडे आत्मपरिक्षण
सत्यासाठी आपल्या पुर्वजांनी
ना ठेविली कुणाची भीड
आपल्या पत्रकारीतेला मात्र
चापलुसीची किड
जनसेवेचे त्यांनी, होते
घेतले सतिचे वाण
आपल्या लेखण्या इथे
भ्रष्टाचाऱ्यांना गहा
असो, आता झाले ते झाले
विचार त्यांचा नको कराया
सुधारणेने प्रतिष्ठा आपली
पुनर्स्थापित करू या
सत्य निष्ठा, नि:स्पृहता
सारे हवेत विरले
पत्रकार दिन, आता
सत्कारापुर्ते उरले
कशाचे जनजागरण
कशाचे प्रबोधन
पेड न्युजने पत्रकारीतेचे
झाले आहे निधन
चला, सारे बदलून टाकू
सगळे जन ठरवू आज
सत्यनिष्ठेने चढवूया
पत्रकारीतेवर नवा साज
आठवू आपण आज बाळशास्त्रीचे दर्पण
पत्रकारीतेतील त्यांचे सर्वस्व समर्पण
आठवू त्यांची आपण निस्सीम ध्येयनिष्ठा
सत्यासाठी करु या, प्रयत्नांची पराकाष्टा
अन्याय, अंधश्रध्देचा अंधार आहे दाटला
अनिष्ठ रुढींनी विवेकाचा स्त्रोत आहे आटला
भ्रष्टाचाराचे सर्वत्र माजले आहे तन
जिथे-तिथे आहे विचारांचे प्रदुषण
संघर्षाने करू दुर वंचितांच्या वेदना
हेच माझे मागणे, हीच माझी प्रार्थना.
लोकशाहीच्या प्रगतीसाठी आम्ही सुध्दा आमच्या लेखणीला गेली 35 वर्ष झिजवले आहे. पण या 35 वर्षात 350ं0 समस्यांना सुध्दा आम्हाला तोंड द्यावे लागले आहे. तरी पण सत्याचा मार्ग आम्ही कधी सोडला नाही आणि जीवनाचा शेवटचा श्र्वास घेईपर्यंत सुध्दा सत्याच्या ध्येयासाठी लढत राहणार आहोत हे आमचे अभिवचन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!