नांदेड, : –ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नियोजन भवन येथे दुपारी 1 वा. साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, ग्राहकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होईल तर अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष राहूल पाटील हे असतील. प्रमुख वक्ते इंजि. बालाजी लांडगे (संघटक, छ. संभाजीनगर विभाग ग्राहक पंचायत महाराष्ट्र), प्रा.डॉ.दीपक कासराळीकर (जिल्हा अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र), अॅड.आनंद बळवंतराव कृष्णापूरकर (जिल्हा संघटक नांदेड ग्राहक पंचायत महाराष्ट्र), सायन्ना मठमवार (जिल्हा उपाध्यक्ष नांदेड ग्राहक पंचायत महाराष्ट्र) हे राहतील.