नांदेड – अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघम व महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संघम राज्य अध्यक्ष रोहितशेठ ( शास्त्री) अडकटलवार, मराठवाडा अध्यक्ष जग्गनाथ बिंगेवार, अखिल भारत युनायटेड वैवाहिक समिती अध्यक्ष सुभाष सेठ बल्लेवार,जेष्ठ समाजसेवक गंगाधरजी मारावार, युनायटेड मराठवाडा अध्यक्ष किशोर राखेवार, उमेश कोकुलवार अध्यक्ष नांदेड जिल्हा, नंदुशेठ अडकटलवार अध्यक्ष नांदेड जिल्हा युवक, चंद्रकांत अलकटवर कोषध्याक्ष मराठवाडा, गणेशजी गड्डम, चंद्रकांत अंकमवार, रवी पेंटलवार सचिव मराठवाडा युवक, गजानन वासमवार कोषाध्यक्ष मराठवाडा युवक, प्रगतीताई नीलपत्रेवार नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष, गणेश गड्डम सदस्य मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघटना, नांदेड उत्तर तालुका अध्यक्ष युनायटेड पद्मशाली संघटना सत्यानंद शिवरात्री, सह सचिव युनायटेड पद्मशाली संघटना श्रीनिवास माडेवार, नागोबा नामेवार, अशोक चटलावार, मनोहर संगमवार सह सचिव, व्यँकटराव चिलवरवार सर, गुंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी श्री विठ्ठल दावजी राखेवार, कापड दुकान येथे धर्माबाद युनाइटेड पद्माशाली समाज संघटनेची प्रौढ, युवक व महिला कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये प्रौढचे अध्यक्ष नागभूषण भुमन्ना सुरुकुटवार व सचिव श्रीराम गोविंदलवार, कार्याध्यक्ष ऍडव्होकेट किशनराव ताणूरकर, गंगाधरराव मारावार तसेच उपाध्यक्ष रामलूजी पोनोड व साईनाथ मदनलवार. युवक अध्यक्ष अशोक येमेवार, सचिव राम चिलकेवार सर, कार्याध्यक्ष सुरेश द्रौपतवार, जगन्नाथ पुलकुंठवार, उपाध्यक्ष रमाकांत सुरुकुटवार, शंकर गंगुलवार सहसचिव सतिष गादेवार, साईनाथ अलचे्टीवार व कोषध्यक्ष साईनाथ सुरुकुटवार, महिला अध्यक्ष सौ रिंकू राजू सुरुकुटवार व सचिव सौ मीना ताणूरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त निवड झालेल्या पदाधिकारी यांच्या सत्कार करण्यात आला व धर्माबाद येथील पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते.