नांदेड(प्रतिनिधी)-यशनगरी वाडी(बु) नांदेड येथे दोन जणांनी एका घरात बळजबरी प्रवेश करून 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली आहे.
दयानंद माधव वारकड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास बालाजी मधुकर मोरे (वय 25 ते 30 वर्ष) रा.हिमायतनगर, बालाजी आहिरे (वय 25 ते 30 वर्ष ) हे दोघे त्यांच्या घरात बळजबरीने घुसले, त्यांना जिवे मारण्याची धमकी देवून, मारहाण करून त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 649/2024 प्रमाणे दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक वाडेवाले हे करीत आहेत.