नांदेड (प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्यात गोवंश जातीची सहा जनावरे बेशुध्द करुन कत्तलीसाठी नेणार्या सात आरोपींना पकडल्यानंतर न्यायालयाने दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणी इतर चार जणांचा शोध सुरु आहे.
१९ डिसेंबर रोजी आणि २० डिसेंबर रोजी कुंडलवाडी रस्त्यावर पोलिसांनी काही गोवंश जनावरे पकडली त्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सय्यद सैफ सय्यद वैâसर (२८), जिया महंमद नवाब कुरेशी (३१), शेख आदनान शेख मुद्दशीर नसीर (२०), फरीद नवाब साब कुरेशी (२०), शेख बाबा खाजामियॉ (४१), अस्लम सत्तार कुरेशी (२९) सर्व रा.बिलोली यांना पकडण्यात आले होते. न्यायालयाने यांना दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या लोकांनी आणखी सात जणांचा समावेश असल्याचे सांगितले. तसेच संघटीतरित्या धर्माबाद, मुदखेड, मरखेल, नायगाव, उमरी, तामसा, वाशिम जिल्हा, यवतमाळ, तेलंगणा राज्यातील काही ठिकाणी गोवंश चोरीचे गुन्हे घडविले असल्याची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, बिलोलीचे पोलीस उपअधीक्षक शेख रफिक यांनी बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार मारोती मुद्देमवार, सुनिल दस्तके, आनंदा शिंदे, व्यंकट धोंगडे, सुरेश वनशेट्टे आदींचे कौतूक केले आहे.