नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीचे कवित्व आता आणखी जोरात आले आहे. अध्यक्ष पदावर बसण्याची इच्छा असणाऱ्या जुन्या अध्यक्षांचे प्रतिनिधी आणि नव्याने अध्यक्ष होण्याची तयारी असणाऱ्यांनी नांदेड जिल्ह्या लगत असलेल्या बीड जिल्ह्याला वाऱ्या सुरू केल्या आहेत. आजपर्यंत वारी फक्त पांडूरंगाची होती. बीड जिल्ह्यात काय आहे. याचा शोध घेण्याची गरज आहे.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीत काही मोजक्याच पत्रकारांना बोलविण्यात आले होते. म्हणजे इतर पत्रकारांना अंधारात ठेवून नवीन अध्यक्षाची निवडणुक करून घ्यायची होती. त्यासाठी राज्य पत्रकार संघटनेने निरिक्षक पण पाठविले होते. पण त्या दिवशी काही युवक पत्रकारांनी निवडणुक व्हायलाच हवी. बिनविरोध निवड आम्हाला मान्य नसल्याचा दावा उपस्थित केला. त्यामुळे त्या बैठकीत काही ठरले नाही. त्या बैठकीत आलेल्या पत्रकारांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती. या भोजनाच्या सोयीसाठी बांधकाम करणाऱ्या एका अधिकाऱ्याकडून 6 आकडी रक्कमेची मागणी झाली. पण सध्या असमर्थता दर्शविल्यानंतर 6 मधील एक आकडा कमी करून पाच आकडी संख्या एवढी मागणी झाली. अखेर त्या अधिकाऱ्याने मी भोजनाचे बिल देवून टाकतो असे सांगितले. ज्यावेळेस त्या अधिकाऱ्याने ते बिल दिले. त्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. तीन पट कमी पैशांमध्ये जेवण उरकले होते. म्हणजे पत्रकार संघाची निवडणुक, ज्यांना निवडूण यायचे आहे त्यांनी खर्च करावा, तो खर्च पण थोडाच होता. त्याच्यासाठी सुध्दा पैशांची मागणी मात्र बांधकाम अधिकाऱ्यांकडे कसे चालेल हे. काय सांगावे स.आदत हसन मंटो काही चुकीचे म्हणाले नव्हते.
आज पर्यंत आम्ही वारी ही फक्त पांडूरंगाची ऐकली होती. पण निवडणुकीबाबतची बैठक झाल्यानंतर नवीन पध्दतीची बीड वारी ऐकायला आली. या संदर्भाचा मागोवा घेतला असतांना बीडमध्ये उंबरठे झिजवले तर आपल्याला अध्यक्षपद मिळेल या आशेतून या बीड वारीची सुरूवात माजी अध्यक्षाच्या प्रतिनिधीने आणि नव्याने अध्यक्ष होण्याची इच्छा असणाऱ्या शिक्षकाने या बीड वारीची सुरूवात केली आहे अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.