नांदेड(प्रतिनिधी)-चोरी गेलेला पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक नांदेड ग्रामीण पोलीसांनी काही तासातच शोधून काढला आहे आणि आरोपीला गजाआड केले आहे.
दिपक चोखोबा कोकरे रा.वाजेगाव यांनी 14 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार वाजेगाव वळण रस्त्यावरून त्यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एम.एच.26 एच.8248, किंमत 5 लाख रुपयांचा चोरीचा गेला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1153/2024 दाखल करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे, पोलीस अंमलदार नरेंद्र यालावार, सय्यद अजरोद्दीन, शेख फारूख यांनी आपले कसब वापरून चोरी गेलेला ट्रक काही तासातच पकडला. हा ट्रक शेख अबुबकर शेख महेबुब (22) मुळ. रा.ईस्लामपुरा लातूर ह.मु. वाजेगाव याने चोरला होता. यालाही पोलीसांनी गजाआड केले आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले आहे.