नांदेड :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 (15 ते 29 वर्षाआतील युवक-युवती) चे आयोजन 12 ते 14 डिसेंबर, 2024 या कालावधीत कुसुम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड येथे संपन्न झाले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन पुणे विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक व सहायक संचालक मिलींद दिक्षीत, सहाय्यक संचालक, हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे ,श्रीमती सान्वी जेठवाणी, अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था,नांदेड आदि मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.
संकल्पना आधारीत स्पर्धा – प्रथम – पुष्यमित्र किशवराव जोशी (छ.संभाजीनगर), द्वितीय – विश्वम्राज्ञी रामराजे माने (कोल्हापूर), तृतिय विभागून- सिध्दी संदिप पांडे, प्रणव गोपाळ बोरसे (मुंबई) व अनुराग राजेश पाटील (नाशिक)
समुह लोकनृत्य – प्रथम – मुंबई विभाग (दिवली नृत्य), द्वितीय- कोल्हापूर विभाग (लेझीम नृत्य), तृतीय- पुणे विभाग (कातकरी नृत्य)
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम – अनुष्का बॅनर्जी (पुणे), द्वितीय- अंश राय (मुंबई), तृतीय विभागून- प्रेरणा राऊत (नागपूर) व अक्षरी मोरे (लातूर)
काव्य लेखन – प्रथम – तनुजा अमित कंकडालवार (नागपूर), द्वितीय- रसिका मुकंद ढेपे (वाशिम), तृतिय- अथर्व विश्वास केळकर (नाशिक)
चित्रकला – प्रथम – कुणाल विष्णु जाधव (नाशिक विभाग), द्वितीय- प्रतिक हाणमंत तांदळे (पुणे), तृतिय विभागून- मुकेश राजेंद्र आढाव (नाशिक विभाग) व समय अजय चौधरी (अमरावती विभाग)
कथा लेखा- प्रथम – व्यंकटेश नारायण नेरकर (अमरावती विभाग), द्वितीय –अक्षता रविंद्र जाधव (कोल्हापूर विभाग), तृतिय विभागून– ऋषिता चंद्रशेखर पवार (लातूर विभाग) व साक्षी उध्दवराव खरात (छ.संभाजीनगर)
समुह लोकगीत– प्रथम – लातूर विभाग, द्वितीय- अमरावती विभाग, तृतीय विभागून- कोल्हापूर विभाग व नाशिक विभाग
या युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगीरी केलेल्या युवक-युवतींनी दिल्ली येथे 12 ते 16 जानेवारी,2025 दरम्यान संपन्न होणा-या राष्ट्रीय युवा महोत्सव 2024-25 करीता महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणुन
संकल्पना आधारीत स्पर्धा- प्रा.डॉ. मनिष देशपांडे (नांदेड), प्रा. डॉ. एन.आर.पवार (यवतमाळ), प्रा.डॉ. आनंद आष्टुरकर (नांदेड), समुह लोकगीत करीता प्रा.डॉ. निखिलेश नलोडे (यवतमाळ), प्रा. डॉ. शिवराज शिंदे (नांदेड), मा. शाहीर संतोष साळुंखे (लातुर), संकेत राजपुत (मुंबई), राहुल तायडे (अमरावती), समुह लोकनृत्य – प्रा. डॉ. रवींद्र हरीदास (नागपूर), प्रा. डॉ. पंकज खेडकर (परभणी), प्रा.राजेंद्र गजानन संकपाळ (सातारा), मा. डॉ. सान्वी जेठवाणी (नांदेड), मा. श्री. संदेश हटकर (नांदेड), वकृत्व स्पर्धा- प्रा. डॉ. रमा नवले (नांदेड), प्रा.डॉ. संदिप काळे (नांदेड), काव्य लेखन स्पर्धा – प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख (नांदेड), मा. श्री. बापु दासरी (नांदेड), प्रा. डॉ. संभाजी मनुरकर (नांदेड), चित्रकला स्पर्धा – प्रा. शेख जाहेद उमर (छ.संभाजीनगर), प्रा. सौ. कविता जोशी (नांदेड), प्रा. सिध्दार्थ नागठाणकर (परभणी), कथा लेखन स्पर्धा- प्रा. डॉ. पांडुरंग पांचाळ (कंधार-नांदेड), सुहास देशपांडे (नांदेड), डॉ. चंद्रशेखर दवणे (लातूर)
ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, डॉ.बालाजी पेनूरकर, फजल गफुरसाब मुल्ला, मकरंद पाटील, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे आदिनी सहकार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.