रिपब्लिकन सेनेचे संविधान प्रतिकृती विटंबनेबाबत निदर्शने

नांदेड (प्रतिनिधी)-परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी आज दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोर आयटीआय येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पुतळ्या समोरील संविधानाची प्रतिकृतीची एका जात्यांध युवकाकडून नासधूस करण्यात आली. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यामुळे परभणीत तीव्र संताप व्यक्त करत आंबेडकरी जनतेने आंदोलन उभारले असता प्रशासनाने पोलिस बळाचा वापर करत अमानुष लाठीचार्ज केला.एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना करणे आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेबांच्या कायद्याची पायमल्ली करत सर्वसामान्य नागरिकांवर बेछूट लाठीचार्ज करणे अशी हुकूमशाही महाराष्ट्रात सुरू असल्याने या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्याला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करण्याच्या मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजू सोनसळे, माधवदादा गायकवाड, राजेश्वर पालमकर, राहुल चिखलीकर, रुपेश सोनसळे, माधव चित्ते, प्रतीक मोरे, मधुकर झगडे, संदीप मांजरमकर, प्रशांत गोडबोले, काका डावरे, विलास असले, के एच वने, भारत भालेराव, सावळे सर, अमर जोंधळे, अमर वाघमारे, अविनाश गायकवाड, महेश पंडित, सागर गायकवाड, टिंकू खंडागळे, गौतम नगर येथील महिला मंडळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!