भारतीय जनता पार्टीने जॉर्ज सोरोस नावाचे जिवंत भुत आपल्या संसदेत उभे केले

शेतात बुजगावणे उभे करून पाखरांना भिती दाखविण्याचा एक खोटा नाटकाचा प्रयोग शेतकरी करतात आणि त्यातून आपल्या पिकांची रक्षा करतात. असाच काहीसा प्रकार सध्या भारतीय संसदेत सुरू आहे. जॉर्ज सोरोस नावाचे बुजगावणे अर्थात भुत तयार करून विरोधी पक्षांतर्फे सरकारवर होणाऱ्या हल्यांचे संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचे उत्कृष्ट कार्य भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्रात करत आहे. यातून मिळेल काय? याचे उत्तर काहीच नाही असेच आहे. महत्वाचा प्रश्न उद्या 13 डिसेंबर रोजी ठरवलेल्या संविधानावर चर्चा होणार की, नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. दोन दिवसांपुर्वीच उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका न्यायमुर्तीने संविधानाबाबत आणि मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे 13 डिसेंबर हा दिवस सुध्दा अर्धवटच आहे. काय चालले आहे भारताच्या लोकशाहीत याचा काही मागमुस लागत नाही. सर्व जगात सक्षम असणाऱ्या भारताच्या पंतप्रधानाला सोरोस नावाचे भुत त्रास देते आणि ते सुध्दा विरोधी पक्षाच्या माध्यमातून. उद्या पंतप्रधानंाना काही कारणांनी खरचटले तरी त्याचा आरोप विरोधी पक्षांवरच होईल अशी या भारतीय लोकशाहीची दुर्देवी अवस्था सुरू आहे.


कधीकाळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असलेले आणि सध्या केंद्रात मंत्री असलेले जयप्रकाश नड्डा यांनी सोरोस आणि सोनिया गांधी यांचे काय संबंध आहेत याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. नड्डांना हे कळले नाही की, जॉर्ज सोरोस हा कोण आहे. त्यासाठी आम्ही त्यांची मदत करतो. जाजॅ सोरोस हा व्यक्ती 94 वर्षाचा आहे. त्याच्या संपत्तीचा आकडा अद्याप कोणाला पुर्णपणे माहित नाही. एवढी मोठी त्यांची संपत्ती आहे. ते जगभरात शिक्षण, शेतकरी, छोटे उद्योगधंदे, स्टार्टऍपसारख्या कामकाजांना निधी देतात. हे सर्व अभिलेखावर आहे. नड्डा यांनी सोनिया गांधी आणि सोरोसचे संबंध काय हे सांगतांना कधी काळी अर्थात 1990 च्या दशकात त्या सोरोससोबत एका संस्थेमध्ये सहअध्यक्ष होत्या असे म्हणतात. 1990 च्या दशकात आणि आज 2024 मध्ये काही बदल झाला नाही काय? आणि झालेला बदल नड्डा यांना कळला नाही काय? आणि कळला नसेल मग नड्डा भारताच्या सभागृहात सोरोसचे नाव कशाला घेतात. खरे तर आता आम्ही लिहिले आहे तेंव्हा आरएसएस, बीजेपी यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन सोरोसच्या घरासमोर अर्थात अमेरिका देशातील ज्या गावात सोरोस राहतात तेथे धरणे आंदोलन करावे. गौतम अडाणीचे स्वत:चे एक चॅनल आहे. जे चॅनल त्यांनी सरकारच्या मदतीने डॉ.प्रणय रॉय यांना विक्री करायला लावून स्वत: खरेदी केले आहे. त्या चॅनलमधील अँकर, संपादक यांनी भारताच्या नोयडामध्ये बसून सोरोसच्या बातम्या करण्याऐवजी त्याच्या घरासमोर जाऊन अमेरिकेतून थेट प्रेक्षपण करावे आणि त्यांना विचारावे की, तु भारत देशात काय करतो आहेस आणि का करतो आहेस.


सन 2023 मध्ये हिडनबर्ग अहवाल आल्यानंतर एकदा जॉर्ज सोरोस ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत म्हणाले होते की, अदाणी आणि मोदी यांचे भाग्य सोबत जोडलेले आहे. भारतात लोकतंत्र आहे पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकतांत्रिक नाहीत. त्यांच्या प्रगतीच्या मागे मुस्लिम समाजाविरुध्द हिंसेला हवा देणे सुरू आहे. असे कृत्य सोरोसने केले आहे. याबाबत सोरोसला विचारण्याऐवजी विरोधी पक्षाचा उपयोग करून अर्थात कॉंगे्रस आणि विशेष करून गांधी परिवार यांचा उपयोग करून सोरोस भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप सभागृहात सरकार पक्षाचे सदस्य करतात. खरे तर संसदेमध्ये प्रश्न विचारण्याचा मुळ धंदा विरोधी पक्षांचा आहे आणि सरकार पक्षाने त्याला उत्तर द्यायचे असते. पण हे सर्व उत्तर दिशेने चालू आहे. सध्या अमेरिकेचे नुतन राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी हरमित कौर ढिल्लो भारत वंशीय महिलेला आपल्या सिव्हील राईट ऍटोर्नी जनरल या पदावर नियुक्त केले आहे. हरमित कौर यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता. तसेच भारतावर आरोप पण केला होता की, भारताच्यावतीने अमेरिका आणि कॅनडा देशात खलिस्तानवाद्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. यावर भारतातर्फे अमेरिकेला विचारणा होणार आहे काय? किंवा यात सुध्दा खा.राहुल गांधींचा हात आहे काय? हे केंद्रीय सरकारने शोधायला हवे.
भारतात सोरोसचे आगमन 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना झाले. पण त्यांनी 2014 पासून वेगवेगळ्या कामांना निधी देण्यासाठी सुरूवात केली. त्यामध्ये गौरव हिंदुजा, शशांक ऋषीसिंह यांचा सुध्दा समावेश आहे आणि नरेंद्र मोदी या दोघांना व्यासपीठावर घेवून बसतात, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि सोरोसचे संबंध आहेत असा आरोप विरोधी पक्षांनी केला तर त्याचे काय उत्तर सरकारकडे आहे. सोरोसवर असाही आरोप केला जातो की, सन 1991 मध्ये त्यांनी बॅंक ऑफ इंग्लंड भंग केली होती. त्यामुळे त्यांना 6 बिलीयन एवढा फायदा झाला होता. त्याच प्रमाणे ते भारताच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॅंक ऑफ इंग्लंड भंग झाल्याने भारताच्या खासदाराला चिंता करण्याची गरज नाही. ही चिंता इंग्लंडच्या पंतप्रधानांची आहे तसेच इंग्लडच्या जनतेची आहे. ज्या इंग्लंडमध्ये सन 2018 मध्ये जॉर्ज सोरोसचा अनेक जागी सन्मान होतो. जॉर्ज सोरोसला इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी बोलावले जाते. त्या इंग्लंडमधील लोकांना बॅंक ऑफ इंग्लंडची परिस्थिती माहित नसेल काय? इंग्लंडची चिंता भारताच्या खासदारांना आहे. पण भारतासह अनेक देशांमध्ये कायदेशीर कार्यवाही झालेल्या गौतम अडाणी विरुध्द मात्र विरोधी पक्ष बोलले तर त्यांचे शब्द पटलावरून काढण्यात येतात.
सोबतच सरकारच्यावतीने ओसीसीआरपी या शोध पत्रकारीतेतील संस्थेने दिलेल्या बातम्यांचा उपयोग करून विरोधी पक्ष भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप केला जातो. सोबतच ओसीसीआरपीला जार्ज सोरोस निधी देतात असेही सांगितले जाते. ओसीसीआरपी यांनी या संदर्भाने जाहीर केले आहे की, आम्हाला निधी देणाऱ्यांची नावे आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रसिध्द करीत असतो. तसेच आमचे स्वातंत्र्य आम्ही स्वत: सुनिश्चित करतो असे ओसीसीआरने लिहिले आहे. सोबतच भारतात सुरू असलेल्या या परदेशी भुताबदल भारतीय जनता पार्टी बातम्यांचा खोटा उपयोग करत असल्याचे एका जागतिक वृत्तसंस्थेने सांगितले आहे. विरोधी पक्षाने एखादे ट्विट केले तर संसद बंद पडते असा हास्यास्पद आरोप करून स्वत:चेच हसे करून घेतले आहे. परंतू खासदाराचे सर्व भाषण पटलावर उपलब्ध आहे. भारताचे मंत्री एस.जे.शंकर, पीएमओ कार्यालयातील डॉ.शमीका रवी यांनी सुध्दा सोरोसच्या निधीतून पैसे घेतलेले आहेत. मग त्यांच्यावर सरकार कार्यवाही करणार काय? यापेक्षा खरे तर पंतप्रधानांनी जॉर्ज सोरोसचा निधी वापरणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांवर कार्यवाही करून दाखवून द्यावे की मी असे सुध्दा करू शकतो. फक्त सभागृह बंद पडावे, देशाच्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणार नाही यासाठी हे विदेशी सोरोस भुत भारतीय जनता पार्टीने तयार केले आहे. शहीदाच्या पत्नी असलेल्या सोनिया गांधी यांच्यावर आरोप करतांना खासदारांनी आपल्या घरातील देशासाठी कोण शहीद झाला याचा विचार करावा म्हणजे दुसऱ्यावर आरोप करतांना थोडी तरी लाज वाटेल.
आम्ही लिहिलेले विश्लेषण पत्रकार रविशकुमार यांच्या व्हिडीओतून घेतले आहे. त्या व्हिडीओची लिंक बातमीसोबत जोडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!