नांदेड(प्रतिनिधी)-4 डिसेंबर रोजी एका 67 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्याला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. रिंदा पथकातील कर्मचाऱ्यांची सुध्दा या कामासाठी मदत घेण्यात आली आहे.
दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मौजे वाका शिवारातील आबाजी गणपत हंबर्डे यांच्या शेतालगत जाणाऱ्या रस्त्यावर एक प्रेत सापडले. त्या व्यक्तीचे नाव किशन हरी खोसे (67) रा.वाका असे आहे. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2024 अज्ञात मारेकऱ्याविरुध्द दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एच.घोगरे, पोलीस उपनिरिक्षक ए.एच.बिचेवार, साईनाथ पुयड आणि उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सी.पी.पवार यांनी वेगवेगळी पथक स्थापन करून वाका शिवारात ठाण मांडून अखेर वाका येथील मदन अंबादास हंबर्डे (36) यास पकडले. 67 वर्षीय व्यक्तीचे महिलेशी अनैतिक संबंध आणि जुने वैमनस्य या कारणातून मदन हंबर्डेने किशन खोसेचा खून केला होता.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकाऱ्यांसह पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, राजू डोंगरे, तिरुपती तेलंग, विलास कदम, संतोष बेल्लुरोड, संदीप घोगरे, मोतीराम पवार, अनिल बिरादार, विश्र्वनाथ पवार, मारोती मोरे, धम्मानंद जाधव, रुपेश दासरवाड, देविदास चव्हाण, साहेबराव कदम, राजू बोधगिरे, शेख इसरायल, तानाजी येळगे, संजय राठोड, मारोती मुंडे, दादाराव श्रीरामे, अकबर पठाण, सिध्दार्थ सोनकांबळे, अमोल घेवारे, सुधाकर देवकत्ते यांच्यासह उस्माननगरचे पोलीस अंमलदार नामदेव रेजितवाड, अशोक हंबर्डे, माधव पवार, अनिरुध्द वाडे, आप्पाराव वरपडे, पल्लवी डोळे, पुजा भातकुळे, सायबर शाखेतील राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखे व्यतिरिक्त स्वतंत्र रिंदा पथक या नावाखाली कार्यरत असलेले देविदास चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार यांना स्थानिक गुन्हा शाखेतील कामासाठी घेण्यात आले आहे. रिंदा पथक तरी बरखास्त व्हावे किंवा या तिघांना स्थानिक गुन्हा शाखेत पुन्हा घ्यावे अशी चर्चा पोलीस अधिक्षक कार्यालयाात ऐकायला येत आहे.