नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी गोवंश जातीचे सात बैल पकडले आहेत. या संदर्भाने एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बैलांची किंमत 2 लाख 80 हजार रुपये आहे.
इतवारा गुन्हे शोध पथकाने 9 डिसेंबर रोजी उमर कॉलनी देगलूर नाका भागात एका ठिकाणी बांधून असलेले 7 गोवंश जातीचे बैल पकडले. हे बैल कत्तलीसाठी बांधले असल्याची माहिती पोलीसांकडे होते. बैलांच्या दाखल्या बद्दल उमर कॉलनी येथील महंम्मद सलीम महंम्मद खाजा कुरेशी (46) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे ते दाखले नव्हते. त्यानुसार पोलीस अंमलदार हबीब जाबर चाऊस यांनी दिलेल्या तक्रारीवरुन महंम्मद सलीम विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 आणि 9 नुसार गुन्हा क्रमांक 441/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कस्तुरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ही उत्कृष्ट कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी इतवाराचे पोलीस निरिक्षक सदाशिव भाडीकर, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक विलास पवार, पोलीस अंमलदार कस्तुरे, चाऊस, अर्जुन मुंडे, दासरे, रेवननाथ कोळनुरे, जावेद आदींचे कौतुक केले आहे.