नांदेड- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
राज्य नाट्य स्पर्धेतील “स्वप्नपंख” नाटकाने दुर्लक्षित घटकांच्या शैक्षणिक प्रश्नाला केले अधोरेखित
आज ‘तो ती आणि मनोहर’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेची होणार सांगता नांदेड–सांस्कृतिक कार्य विभाग…
सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल- सिईओ मीनल करनवाल
– पायाभूत सुविधांमध्ये यावर्षी वाढ – सुरक्षा, स्वच्छता, जागरुकतेकडे लक्ष – लावणी महोत्सव यावर्षीही आकर्षण…
नांदेडकरांनी उधळले गुलालासोबत निळा आणि हिरवा रंग
एमआयएमची मुसंडी, वंचितने प्रथमच उघडले खात नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचा 7/12 अशोक शंकरराव चव्हाण यांच्याच नावे असल्याचे पुन्हा…
