नवीन नांदेड (प्रतिनिधी)- गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविघालय विष्णुपुरी येथे सिव्हिल तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या भक्ती शरद पिंपळे २१ वर्षीय विद्यार्थिनीने मुलीच्या वस्तीगृहातील 307 खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचीही घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजुन 16 मिनिटां पुर्वी घडली असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत मुलीचे नाव कु. भक्ती शरदप्पा पिंपळे असे असून ती वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे. श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेत भक्ती ही स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती.ती गुरू गोविंदसिंग महाविद्यालय मुलींचे वस्तिगृह येथे 307 रूम मध्ये रविवारी सकाळी खोलीतील अन्य मैत्रिणी नसल्याची संधी साधत तीने खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, बीट पोलीस अंमलदार माधव गवळी व किशोर इंगळे घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याप्रकरणी फिर्यादी राजेश्वर शंकर अप्पा पिंपळे यांनी दिली आकस्मिक 179/2024कलम 194 बिएनएस नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे करीत आहेत.