नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागातील एका हवालदारानपे सहायक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीबाबत दिलेल्या अर्जावरचा निर्णय मागितला असताना तो त्यांना मिळाला नाही म्हणून राज्य माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार आज त्यांना माहितीचे अवलोकन करण्यासाठी बोलाविले आहे. माहितीचे अवलोकन केल्यानंतर सात दिवसांत त्यांना माहिती विनामूल्य उपलब्ध करून द्यावी असे आदेश राज्य माहिती आयुक्त मकंरद रानडे यांनी जारी केले आहेत. दुर्देवाने ते पोलीस अंमलदार पदोन्नती प्राप्त न करताच सेवानिवृत्त झालेले आहेत. अर्थात या जगात काही सहज उपलब्ध होत नाही हे दिसते.
पोलीस विभागात पोलीस हवालदार नासेर अली खान जब्बार खान पठाण हे काही महिन्यांपुर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांनी दि. 3 फेबु्रवारी 2022 रोजी दिलेला अर्ज क्र. 379/2022 प्रमाणे त्यांना सहायक पोलीस उपननिरीक्षक पदोन्नती मिळावी असा होता. या अर्जावर पोलीस अधीक्षकांचा निर्णय किंवा आदेश मिळावा अशी त्यांची मागणी होती. पोलीस अधीक्षक कार्यालयातील माहिती अधिकारी यांनी 30 मे 2022 रोजी त्यांना माहिती दिली होती. परंतु मिळालेल्या महितीने समाधान न झाल्याने नासेर खान पठाण यांनी प्रथम अपिल केले. प्रथम अपिलाची सुनावणी 13 जून 2022 रोजी झाली. तेव्हा प्रथत अपिली अधिकाऱ्याने माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यास सांगून अपिल निकाली काढले होते. तरी पण त्यांना माहिती प्राप्त झाली नाही. म्हणून नासेर अली खान यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्यासमक्ष माहिती अधिकार अधिनियम कलम 19(3) प्रमाणे द्वितीय अपिल सादर केले. याच सुनावणीदरम्यान त्यांना माहिती मिळाली नाही, हे समोर आल्यावर माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी असे आदेश दिले आहेत की, पोलीस अधीाक्षक कार्यालयातील माहिती अधिकाऱ्याने तीस दिवसांत त्यांना नासेर खान पठाण यांना आवश्यक असलेल्या माहितीला अवलोकन करू द्यावे आणि त्यानंतर नासरे पठाण यांनी मागितलेली माहिती त्यांना माहिती कायद्यातील 7 (6) प्रमाणे उपलब्ध करून द्यावी.
त्यानुसार आज दि. 5 डिसेंबर रोजी नासेर खान पठाण यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलाविण्यात आलेले आहे. वृत्त लिहीपर्यंत त्यांनी कोणती माहिती अवलोकित केले आणि त्यातील कोणती माहिती मागितली हे समजलेले नाही. परंतु एक मात्र नक्की पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती मागत आणि त्याची माहिती मिळवत नासेर खान पठाण पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या पदोन्नतीचा फायदा मिळावा म्हणून ते सेवानिवृत्तीनंतर सुद्धा झटत आहेत. यावरूनच सध्याच्या युगात आपल्याला सहजन काही मिळू शकत नाही, हे सिद्ध होत आहे.