नांदेड(प्रतिनिधी)- भगवती रुग्णालयातील वरच्या मजल्यावरून उड्डी मारून रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आजाराला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
आज सकाळी भगवती रुगणालयाच्या वरच्या मजल्यावरून खाली उड्डी मारत रविंद्र शामराव कोकरे(31) रा.चिली (इजा) ता.महागाव जि.यवतमाळ या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे. सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार तो रुग्ण अगोदरच दारुच्या आहारी होता आणि त्याला झालेल्या इतर आजाराच्या उपचारासाठी त्याला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही लोक सांगतात डिप्रेशन आले आणि या रुग्णाने आत्महत्या केली. याबद्दलची पोलीस प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झालेली नव्हती.