नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वजिराबाद भागातून एका महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिणे असा 2 लाख 28 हजार 703 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. लातूरफाटा येथे एका गाडीचे मागचे काच फोडून त्यातून 7 किलो 80 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे 6 लाख 47 हजार 794 रुपये किंमतीचे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. माहुर येथे एका घरात कोणी नाही याची संधी चोरट्यांनी साधली आणि त्यातून 4 लाख 55 हजार 23 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
विजय सुर्यकांत तोललवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 ते सायंकाळी 7.45 वाजेदरम्यान ते आणि त्यांची पत्नी वजिराबाद भागात साहित्य खरेदी करत असतांना पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेले 2 लाख 28 हजार 703 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 577/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक वशिष्ट बिक्कड हे करीत आहेत.
आशिष बालाजीराव डहाळे रा.वेताळगल्ली गंगाखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 नोव्हेंबरला त्यांनी आपली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.22 ए.एम.5330 ही पुजा गार्डन हॉटेल लातूर फाटा येथे रात्री 8.30 ते 9.30 या वेळेदरम्यान उभी केली होती. त्या गाडीचा मागील काच फोडून चोरट्यांनी त्यात असलेली चांदीची बॅग ज्यामध्ये 7 किलो 80 ग्रॅम चांदी होती. तो 6 लाख 47 हजार 794 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 1105/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
कपिलनगर माहूर येथे राहणारे किरण प्रल्हादराव क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 च्यानंतर 1 वाजेदरम्यान त्यांच्या माहुर येथील घराचा कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे किंमत 4 लाख 56 हजार 23 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. माहूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 159/2024 नुसार दाखल केली आहे. या प्रकरणातील चोरी करणाऱ्या शेख जावेद अब्दुल सत्तार (34) रा.मोतीनगर दिग्रस जि.यवतमाळ याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलीस उपनिरिक्षक सुनिल गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले आहे. त्यातील शेख जावेदला आज माहूर न्यायालयाने 2 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या शेख जावेद विरुध्द माहूर पोलीस ठाण्यात यापुर्वी सुध्दा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.