अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यत विशेष मेळाव्याचे आयोजन

नांदेड- कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ठिंबक व तुषार सिंचनाबाबत तालुकास्तरावर, मंडळस्तरावर व तसेच गावोगावी माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!