नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधानसभेची मतमोजणी काल झाली. आज प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला असता झालेले मतदान, मोजलेले मतदान यात फरक दिसून येते. नांदेड जिल्ह्याच्या 9 विधानसभा मतदार संघामध्ये फक्त एक किनवट हाच मतदार संघ असा आहे ज्यामध्ये एका मताचा सुध्दा फरक नाही. झालेले मतदान तेवढेच मोजले गेले. देगलूर हा एक मतदार संघ असा आहे ज्यामध्ये 78 मतदान कमी माजले गेले. पण इतर सात ठिकाणी जास्तच मोजले गेले. जास्त मोजल्याचा एकूण फरक 15 लाख 77 एवढा आहे. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा 30 हजार 538 मतदान जास्त मोजले गेले आहे. नांदेड जिल्ह्याच्या हिशोबाने राज्याचे गणित केले असता सरासरी 3 हजार मतदान प्रत्येक मतदार संघात जास्त मोजले गेले असावे म्हणूनच निवडणुक आयोगाने जरी केलेल्या दोन वेळेसच्या मतदानाच्या टक्केवारीमधील फरक महराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदार संघांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त मतमोजणी जास्त झाल्याचा हा प्रकार आहे.
विधानसभा निवडणुका झाल्या. मतमोजणी झाली. आणि त्यानंतर त्यावर विविध चर्चा सुरू झाल्या. कुठे तरी खेळ झाला आहे हा भाग जास्त जोरात बोलल्या जावू लागला. सर्वसामान्य जनता पुर्ण निवडणुकीच्या आचार संहितेत शासनाच्या विरुध्द बोलत होती. मग सत्ताधाऱ्यांनाच एवढे मोठे बहुमत कसे प्राप्त झाले. निवडणुकीच्या कालखंडात पंतप्रधांनाच्या जाहीर सभांमध्ये रिकाम्या राहिलेल्या खुर्च्या.महाराष्ट्र निवडणुक संपण्यापुर्वी पंतप्रधानांचा विदेश दौरा, गृहमंत्र्यांनी दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्र सोडले.या अशा अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे. सोबतच राजीवकुमारच्या मशीनमध्ये घोळ आहे. याचा चर्चा सुध्दा सुरू आहेत. सोबतच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीनंतर दाखवलेला आळस हा सुध्दा या निवडणुकीच्या निकालामधील महत्वपुणृ विषय आहे. पण जोड-तोड करण्यात भाजप सर्वात भारी आहेच. या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचा पुर्णपणे संपविण्याचा कट प्रत्यक्षात आणलेला आहे. आता ती मंडळी त्यावर काय प्रतिक्रिया देतील, त्यावर काही कायदेशीर कार्यवाही उपलब्ध आहे काय हा भाग वेगळा.
नांदेड जिल्ह्याच्या 9 विधानसभा मतदार संघाच्या निवडणुका आणि नांदेड लोकसभेची पोट निवडणुक यांच्या संदर्भाची आकडेवारी आज प्रसार माध्यमांनी प्रसिध्द केली. त्याचा अभ्यास केला असतांना राजीवकुमारच्या मशीन मधला घोळ दिसून येतो. हा घोळ कसा झाला. हे शोधणे आमचे काम नाही. पण दिसणारे सत्य जनतेसमोर मांडणे हे आमचे काम आहे. मतदार संघ निहाय आकडेवारीतील फरक पुढील प्रमाणे आहे.
नांदेड लोकसभेच्या पोट निवडणुकीत 20 उमेदवार होते. झालेले एकूण मतदान 12 लाख 94 हजार 159 आहे आणि मोजलेले मतदान 13 लाख 9 हजार 620 आहे. ज्यामध्ये नोटाला2911 मते जनतेने दिली आहेत. या मधील जास्त मतदान मोजणीचा फरक 15 हजार 461 आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये किनवट हा एक मतदार संघ असा आहे ज्यामध्ये 18 उमेदवार आहेत. झालेले मतदान 2 लाख 2 हजार 360 आहे. मोजलेले मतदान सुध्दा 2 लाख 2 हजार 360 आहेत. या मतदार संघात जनतेने 1266 मते नोटाला दिली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर हा एक मतदार संघ असा आहे की, ज्यामध्ये झालेल्या मतदानापेक्षा 78 मते कमी मोजण्यात आली आहेत. देगलूर विधानसभा मतदर संघात 12 उमेदवार होते. झालेले मतदान 1 लाख 97 हजार 408 आहे. मोजलेले मतदान 1 लाख 97 हजार 330 आहे. यामध्ये 78 मते कमी मोजली गेली आहे. या मतदार संघात 939 मते जनतेने नोटाला दिली आहेत.
नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात 34 उमेदवार होते. या मतदार संघात झालेले मतदान 2 लाख 20 हजार 145 आहेत. मोजलेले मतदान 2 लाख 21 हजार 349 आहेत. या मतदार संघात 1204 मते जास्त मोजली गेली आहेत. या मतदार संघात नोटाचे मतदान 596 आहेत.
नांदेड दक्षीण विधानसभा मतदार संघात 21 उमेदवार होते. झालेले मतदान 2 लाख 2 हजार 689 आहेत. मोजलेले मतदान 2 लाख 4 हजार 241 आहे. या मतदार संघात 1552 मते जास्त मोजली गेली आहेत. या मतदार संघात 552 मते नोटाला दिली आहेत.
लोहा मतदार संघात 15 उमेदवार होते. त्यामध्ये झालेले मतदान 2 लाख 26 हजार 837 आहे. मोजलेले मतदान 2 लाख 29 हजार 891 आहे. या मतदार संघात जास्त मोजले गेलेले मतदान 1054 आहे. या मतदार संघात जनतेने 1082 मतदान नोटाला दिले आहे.
नायगाव मतदार संघात 11 उमेदवार होते. त्यात झालेले मतदान 2 लाख 29 हजार 737 आहेत. मोजलेले मतदान 2 लाख 32 हजार 227 आहेत. या मतदार संघात जास्त मोजणी झालेलेल्या मतांची संख्या 2490 आहे. या मतदार संघात नोटाला 743 मते मिळाली आहेत.
हदगाव विधानसभा मतदार संघात 25 उमेदवार होते. त्यात 2 ल ाख 14 हजार 653 मते झाली आहेत. मोजलेले मतदान 2 लाख 16 हजार 363 आहेत. या मतदार संघात जास्त मोजणी झालेल्या मतांची संख्या 1710 आहे. या मतदार संघात 600 मते जनतेने नोटाला दिली आहेत.
मुखेड मतदार संघात 12 उमेदवार होते. तेथे झालेले मतदान 2 लाख 15 हजार 401 आहे. तेथे मोजणी झालेलीे मतदान 2 लाख 18 हजार 554 आहे. या मतदार संघात जास्त मोजणी झालेल्या मतांची संख्या 3153 आहे. या मतदार संघात जनतेने 557 मते नोटाला दिली आहेत.
भोकर मतदार संघात 26 उमेदवार होते. तेथे 2 लाख 31 हजार 365 मतदान झाले आहे. मोजणी झालेले मतदान 2 लाख 33 हजार 357 आहे. या मतदार संघात जास्तीचे मोजणी झालेले मतदान 1992 आहेत. या मतदार संघात 284 मते नोटाला मिळाली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघात एकूण 15 हजार 155 मतदान जास्त मोजले गेले आहे. एकूण नोटांचे मतदान 6903 आहे. लोकसभा मतदार संघातील जास्तीचे मतदान 15 हजार 461 मोजले गेले आहे. त्यात 2911 नोटांचे मतदान आहे. आकडेवारीची सत्यता किती खरी किती खोटी देव जाणे. परंतू या आकडेवारीमध्येच किनवट मतदार संघात एकाही मताचा फरक नाही आणि देगलूर मतदार संघात 7 मतदान कमी मोजले गेले आहे. याची सत्यता कोण तपासेल. राज्याचा विचार केला तर 288 विधानसभा मतदार संघांमध्ये निवडणुक आयोगाने वाढवून दाखविलेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार राज्यात 10 लाख मतदान वाढीव मोजण्यात आले आहे. यातील सत्य राजीवकुमार जाणे, त्याचे निवडणुक निर्णय अधिकारी जाणे किंवा देव जाणे. आकडेवारी जनतेसमोर मांडण्यासाठीच आम्ही लिहिली आहे.