नांदेड(प्रतिनिधी)-नुकताच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथील रोहित धोंडगे या विद्यार्थ्याने आपल्या कर्तूत्वाची छाप देशावर पाडली असून देशात पहिल्या क्रमांकाने येण्याचा बहुमान मिळविल्याने नांदेडकरांची मान त्यानी उंचावली, अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
एका ग्रामीण भागातील राहणारा रोहित धोंडगे यांनी देशाच्या सर्वोच्च परिक्षेत आपला प्रथम क्रमांक मिळवून नांदेड जिल्ह्याची मान उंचावली आहे. लोकसभा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध पदासाठीच्या परिक्षेत रोहित धोंडगे यांनी दुसऱ्याच प्रयत्नात सर्वोच्च यशाला गवसनी घातली. इंडियन इंजिनिअरींग सर्व्हीसेस या पदासाठी आयएएस परिक्षा उत्तीर्ण होवून त्यांनी आपले यश संपादन केले. यात देशात तो पहिल्या क्रमांकाने आला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षक नांदेड शहरात झाले. यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी हैद्राबाद येथील नारायण या शैक्षणिक संस्थेत 11 वी आणि 12 वीसाठी प्रवेश घेतला. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हैद्राबाद येथे आयटी या इंजिनिअरींग या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरींग करीत असतांनाच त्यांनी युपीएससीच्या परिक्षेचीही तयारी केली. त्यानी पहिल्याच प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहचला होता. पण या ठिकाणी मुख्य परिक्षेत मार्क कमी असल्यामुळे त्यांना या ठिकाणी अपयशाला सामोरे जावे लागले असले तरी तो खचून न जाता. पुन्हा तयारी सुरू केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्याने आपले देह गाठल. हे गाठत असतांना 11 वी आणि 12 या दोन वर्षाच्या शैक्षणिक वर्षात त्यांनी मोबाईलपासून कायम दुर राहिल होत. यानंतर त्यांनी मोबाईलचा वापर केला पण खुप कमी. मोबाईलचा वापर हा चांगल्या कामासाठी केल्यानंतर मोबाईलही वाईट नाही अशी भावना ते व्यक्त करत असतांना त्यांनी विद्यार्थ्यांना सल्लाही दिला की, माबाईलमधील व्हाटसऍप, फेसबुक, इंस्टाग्राम व इन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या उपयोगात पडणाऱ्या गोष्टीवर लक्ष द्याव यातूनही बरच काही यश मिळवता येत. यासाठी खाजगी शिकवणी वर्ग लावले होते. पण एकही वर्ग न चुकता मी केले आहेत. महाराष्ट्रातील मुले हे परिक्षेला घाबरतात कारण ही परिक्षा खुप अवघड आहे. यात मला यश मिळेल की नाही अशा अवस्थेत असतात. मी दिल्लीत असतांना अनुभव घेतला आहे. पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या परिक्षेला न घाबरता आत्मविश्र्वासाने पुढे द्यावे यश च्च्ति प्राप्त होते असा सल्लाही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांनी दिली. त्यांच्या या यशाबद्दल तमाम नांदेडकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात वास्तव न्युज लाईव्ह परिवारानेही त्यांच्या पुढील प्रशासकीय काळासाठी शुभेछच्दा दिल्या.