राजीवकुमारच्या मशिनमध्ये जनतेने कोणाचे नशिब बंद केले

हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने 1995 नंतर द्वितीय क्रमांकाचा मतदान आकडा यंदा गाठला आहे. जनतेने एकूण 65.2 टक्के मतदान केले आहे. तर 1995 मध्ये ही टक्केवारी 71.7 होती. देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रत्येक मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांच्या एजंटला नमुना क्रमांक 17 सी भरून दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता उमेदवारांनी मतमोजणी होतांना नमुना क्रमांक 17 सी मध्ये लिहुन दिलेले झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मोजले गेलेले मतदान हे एकच आहे काय? हे तपासायला हवे तरच राजीवकुमारच्या मशीनमध्ये काही गडबड होणार नाही. जनतेने राजीवकुमारच्या मशीनमध्ये कोणाचे नशिब बंद केले आहे हे 23 नोव्हेंबर रोजी कळेल. विश्र्वास करायला हरकत नाही. की, वास्तव न्युज लाईव्हने मागील दहा ते बारा दिवसांमध्ये निवडणूक विश्लेषण लिहुन जनतेसमोर मांडलेल्या मुद्यांना जनतेने किती प्रतिसाद दिला हे सुध्दा दिसेल.
जनतेच्या वेदनांना शब्द देणे हे व्रत घेवूनच वास्तव न्युज लाईव्हने आपले काम सुरू केलेले आहे. त्यामुळे या आमच्या व्रताला आम्ही कधीच सोडलेले नाही. काही जणांनी आम्हाला विचारले की, उद्या सत्ता बदल झाल्यावर मग काय लिहिणार आम्ही त्यांना उत्तर दिले की, आम्ही कोणत्याही सत्ते विरुध्द नाही. परंतू सत्तेत बसलेल्या लोकांपर्यंत जनतेच्या वेदना पोहचविण्यासाठीच आम्ही वास्तव न्युज लाईव्ह या माध्यमाने आपले काम सुरू केलेले आहे. सत्तेवर कोणीही असो जनतेच्या वेदनांना शब्द देण्याचे काम आम्ही अव्याहत करणारच आहोत. आजपर्यंत दिसलेल्या पत्रकारीतेमध्ये काही पत्रकार हे नेत्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खबरे आहेत. हे काम करत असतांना काही पत्रकारांना हा अंधविश्र्वास बळावतो की, माझ्या ज्ञानोमुळे हा गल्लीतला नेता आज मुख्यमंत्री झाला. तेंव्हा मी सुध्दा मुख्यमंत्री का होवू शकत नाही. म्हणून अनेक पत्रकार नेते झालेले आहेत. त्यात ज्याला सलाम करावा वाटेल असे व्यक्तीमत्व आमच्या दृष्टीकोणातून अरुण शौरी हेच आहेत. बाकी सर्वांनी नेते बनताच धंदा सुरू केला. काल-परवाच संजय निरुपम यांची निवडणुक निशाणी असलेल्या एका चार चाकी वाहनात 2 कोटी रुपये सापडले. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंपासून मुख्य संपादक म्हणून सुरू केलेले काम नंतर ते कॉंगे्रस पक्षात गेले, कॉंगे्रस पक्षानंतर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आलेले आहेत. या प्रवासाला जास्त बोलण्याची काही गरज नाही. आम्ही फक्त यासाठीच हा प्रसंग लिहिला आहे की, पत्रकारांची खरी पध्दती काय आणि आज काय चालले आहे. नाही तर संजय निरुपमवर एक पुस्तक लिहिता येईल.
आता विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान संपले आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. काही दिवसांपुर्वीच पार पडलेल्या हरीयाणा निवडणुकीमधून विरोधी पक्षांनी काही धडे घेतले असतील तर नक्कीच महाराष्ट्राच्या निवडणुक निकालांमध्ये हरीयाणासारखी परिस्थिती येणार नाही. निवडणुक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 17 सी हा नमुना क्रमांक प्रत्येक मतदान केद्रांवरील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेला आहे. या संदर्भाचे विश्लेषण सुध्दा आम्ही लिहिले होते की, नमुना क्रमांक 17 सी का घेणे आवश्यक आहे. शासनाने नमुना क्रमांक 17 सी दिलेला असेल तर मतमोजणीच्या दिवशी उघडली जाणारी राजीवकुमार यांची मशिन नमुना क्रमांक 17 सी मध्ये लिहिलेल्या मशीन क्रमांकच मतमोजणीच्यावेळी आहे काय हा पहिला मुद्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवायला हवा. त्या नमुना क्रमांक 17 मध्ये झालेले मतदानाचे आकडे आणि त्या मशिनमध्ये मोजणी झालेले आकडे एकच यायला हवेत. याची दक्षता आणि तपासणी राजकीय पक्षांनी मतमोजणीच्या वेळी करणे आवश्यक आहे. तरच महाराष्ट्राच्या निवडणुकीचे हाल हरीयाणासारखे होणार नाहीत. सोबतच मतमोजणीची मशिन सुरू करतांना त्याची बॅटरी किती टक्के आहे हे सुध्दा तपासायला हवे. कारण जेंव्हा मतदान सुरू होते. तेंव्हा मशिनची बॅटरी 96 ते 99 टक्के चार्ज असते. मतदान संपते आणि मशिन बंद केली जाते त्यावेळी त्या मशीनमध्ये 60 ते 75 टक्के चार्जिंग शिल्लक दाखवत असते. मतमोजणीच्या दिवशी एखाद्या मशिनची चार्जिंग 99 टक्के असेल तर मग त्याला शंका घेणे आवश्यकच आहे.
कोणत्याही सत्ताधिशाला आपले सिंहासन सोडावे वाटत नसते आणि त्यासाठी लागेल ती प्रक्रिया ज्यात साम-दाम-दंड-भेद या सर्व निती तो वापरत असतो. काही विचारवंत सांगतात युध्द आणि प्रेम यामध्ये सर्व काही चालते. निवडणुक सुध्दा एक युध्दच आहे. फक्त यात शस्त्रांचा उपयोग नाही. तर मतदानाचा आधार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत उत्तर प्रदेशमध्ये जवळपास डजनभर विधानसभा पोटनिवडणुका झाल्या. कारण तेथील आमदार आता खासदार झाले आहेत. म्हणून आमदारंाच्या जागा रिकाम्या होत्या. उत्तर प्रदेश मध्ये असलेल्या सत्ताधिशांनी आपल्या विरोधात जाणाऱ्या लोकवस्त्यांमधून मतदान केंद्रापर्यंत येणारे अनेक रस्ते खोदले जेणे करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाता येणार नाही. निवडणुकीच्या मतदान केंद्रात केंद्र अध्यक्ष आणि त्याचे सहकारी निवडणुक अधिकारी हे आलेल्या व्यक्तीचे नाव, त्याची ओळखपत्र तपासणी करतात आणि त्यांनाच हा अधिकार आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मतदान केंद्राबाहेर उत्तर प्रदेश पोलीसांनी राबविलेली मतदाराला ओळखण्याची पध्दत भारतीय संविधानाला आणि निवडणुक कायद्याला अभिप्रेत नाही. पण यावर कार्यवाही कोण करणार. कार्यवाही करण्याचे अधिकार राजीवकुमार यांना आहेत आणि त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ते काय करत आहेत. हे आता भारताच्या सर्व सामान्य जनतेने सुध्दा कळले आहे असो म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बंद झालेल्या राजकीयकुमार यांच्या मशीनमध्ये जनेतेने कोणाचे नशिब बंद केले आहे. हे 23 नोव्हेंबर रोजी कळेल. मागील दहा-बार दिवसांमध्ये मतदानाचा अधिकार, मतदारांनी घेण्याच्या दक्षता, प्रशासनाची जबाबदारी अशा अनेक विषयांवर आम्ही वृत्तविश्लेषण प्रसारीत केलेेले आहे. निवडणुकांचा निकाला येईल तेंव्हा हे सुध्दा लक्षात येईल की, आमच्या वृत्तविश्लेषणाला वाचलेल्या किती वाचकांनी प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!