मतदारांनो उद्या सकाळी आपल्याला मतदान करायला जायचे आहे. आज युट्युब चॅनलवर एक व्हीडीओ प्रसारीत झाला. ज्यामध्ये भाजप नेते विनोद तावडे हे लोकांना पैसे वाटप करत आहेत असा आरोप होत आहे. हा व्हीडीओ हॉटेलमधला आहे. तसेच प्रसिध्द विश्लेषक अशोक वानखेडे उर्फ टायगर यांनी आपल्या एक्सरे कार्यक्रमात रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या कार्यक्रमाचे विश्लेषण करतांना एकाच कंपनीला ाते कंत्राट तिसऱ्यांदा बहाल करण्याचे सांगिेतले आणि त्याची तारीख 15 नोव्हेंबर असल्याचे सांगितले. आम्ही मागील आठ ते दहा दिवसांपासून दररोज एक विश्लेषण सादर करत आहोत. त्या मागे भावना एवढीच आहे की, भारतातचा सर्वात दरडोई उत्पन्न असलेला प्र्रदेश महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातील लोकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य व्यक्तीची निवड करावी एवढ्यासाठीच आम्ही मेहनत घेत आहोत.
आज सहा तासांपुर्वी एका हॉटेलमध्ये काही लोकांनी भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद तावडे यांना घरले आणि त्यांच्यावर आरोप केला की, तुम्ही पैसे वाटप करत आहात. पोलीस घटनास्थळी हजर असल्याने काही मोठे अभद्र घडले नाही. पण होणाऱ्या आरोपातील तथ्य जाणून कोण घेईल. विनोद तावडेंनी सुध्दा अत्यंत स्पष्टपणे या संदर्भाने उत्तर द्यायला हवे आहे. काल भिमआर्मीचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे उत्तर प्रदेशमधील एका भागात फिरत असतांना त्यांनी पोलीसांना विचारणा केली की, तुम्ही पैसे वाटत आहात. यावर पोलीस नाहीच म्हणाले. पण रावणने एका पोलीसाच्या हातातील कागदांची मागणी केली तेंव्हा त्या पोलीसाने ती कागदपत्रे खा.रावण यांच्या हातात दिली. ती मतदार यादी होती. तेंव्हा रावण यांनी विचारले की, तुमच्या हातात मतदार यादीची गरज काय? कारण तुम्हाला मतदान केंद्रांची सुरक्षा करायची आहे. मतदार यादीशी तुमचे काय देणे-घेणे या वर मात्र पोलीस निरुत्तर झाले. या दोन्ही घटनांमध्ये घडलेला प्रकार आणि दिसत असलेली परिस्थिती पारदर्शक नक्कीच नाही. उत्तर प्रदेशची घटना सुध्दा भारतीय जनता पार्टीच्या विरुध्द आहे आणि महाराष्ट्रातील विनोद तावडेंचा प्रकार त्या पेक्षा जास्त भयंकर आहे कारण काही दिवसांपुर्वी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागावी अशी चर्चा सुरू होती. जनतेने या दोन घटनांकडे पाहतांना आपल्यावर काय अन्याय सुरू आहे याचा विचार करावा.
निवडणुकीतील काही उमेदवार सांगत आहे की, मटन कोणाचेही खा पण मतदान अमुक माणसाला करा. याचाही अर्थ असाच आहे की, मटन वाटप सुध्दा सुरू आहे. एक उमेदवार तर म्हणाला मी 25 हजार किलो मटन वाटले आहे तर मी कसा निवडूण येणार नाही. महाराष्ट्राच्या या निवडणुकीत सुरू असलेले हे प्रकार अत्यंत दु:खदायी आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीची वाट लागली आहे. यापेक्षा जास्त काय सांगणार. 3400 कोटी रुपये कंटेनरने महाराष्ट्रात आले. महाराष्ट्राची बंदरे एकाच व्यक्तीच्या ताब्यात आहेत. मग त्या कंटेनरची तपासणी झाली काय? नाही तर इकडे आपले हेलिकॉप्टर तपासले म्हणून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंना राग येतो आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीची मंडळी स्वत: होवून आपले हेलिकॉप्टर तपासायला लावते आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल करून तपासणी चुकीची नसते असा प्रचार करते. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशाच एका लोकसभा मतदार संघामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी मोसीन खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासले होते. त्यावेळी त्याला निलंबित करण्यात आले होते. हेही विसरता येणार नाही. जनतेने या हेलिकॉप्टर घटना आणि पैसे वाटपाच्या घटना, मटन वाटपाच्या घटना याचा विचार करून आम्ही काही छोट्याशा अमिषाला बळीपडण्यासाठी संविधानाने आम्हाला मतदानाचा अधिकार दिला काय हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे.
प्रसिध्द विश्लेषक अशोक वानखेडे उर्फ टायगर यांनी आपल्या एक्सरे या कार्यक्रमात आज सांगितले की, रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कंत्राट एकाच कंपनीला तिसऱ्यांदा मुदवाढ करून देण्यात येणार आहे. वानखेडे यांनी सांगितल्याप्रमाणे 15 नोव्हेंबर 2024 रोजी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय रेल्वे मंत्री उर्फ रिल मंत्री यांनी 40 हजार रेल्वे डब्यांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कंत्राट दिले आहे. एका डब्यामध्ये कॅमेरे बसविण्याची किंमत 50 लाख या कंत्राटमध्ये लिहिलेली आहे आणि एका रेल्वे डब्यामध्ये 6 कॅमेरे लागणार आहेत. 40 हजार रेल्वे डब्यांमध्ये हे कॅमरे लावले जाणार आहेत म्हणजे या रेल्वे डब्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या कंत्राटची किंमत 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होत आहे. आजच्या बाजार मुल्याप्रमाणे 6 कॅमेरे आणि डीबीआर लावण्यासाठी 40 हजार रुपयांचा खर्च येतो. मतदारांनो ही तुमच्या पैशांची लुट आहे. जे पैसे तुम्ही मेहनत करून कमवत आहात त्यावर वाढविण्याच आलेला कर, यापुर्वी कधीच अस्थित्वात नव्हता तो आणला. म्हणजे तुमचे खिसे रिकामे करून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे घर भरण्याचा हा प्रकार आहे.
जनतेने सत्ता बदललीच तर येणारी सत्ता सुध्दा दुधाने अंघोळ केलेली असेल असे आम्हाला नक्कीच म्हणाचे नाही. पण मागील दहा वर्षात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये खरेदी केलेले सरकार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पैशांवर लढल्या गेलेल्या निवडणुका भारताच्या समृध्द लोकशाहीसाठी घातक आहेत. या शब्दांना आम्ही असेही उल्लेखीत करू इच्छीतो की, जनतेने सत्ता बदलाचे मन तयार करावे आणि हे मन तयार करतांना आपल्या मनाची समज घालावी की, दगडापेक्षा विटकर मऊ. भारताच्या लोकशाहीत उद्या दोन राज्यात मतदान होणार आहे. त्यात झारखंड राज्यातील एका टप्याचे मतदान संपले आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या टप्याचे मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्यात सर्व मतदान आहे. महाराष्ट्र देशात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारे राज्य आहे. तसेच झारखंड हा बहुमुल्य खनीजांनी भरलेला प्रदेश आहे. या दोन्ही राज्यांवर बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपले राज्य हवे आहे. आमचा प्रश्न जनतेला आहे की, तुम्हाला तुमचे राज्य नेत्यांच्या हातात द्यायचे आहे की, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात हे तुम्ही ठरवा आणि उद्या मतदान करतांना आमचे मत अमुल्यच असते हे दाखवून द्या.
तावडे यांचा व्हायरल झालेले व्हिडीओ वाचकांसाठी….