गुरूतागद्दी सोहळा सुरू होण्यापूर्वी संचखड गुरूद्वऱ्या चे मुख्य पुजारी साहेब, सिंघ साहीब कुलवंत सिंघ जीच्यां संकल्पनेतून, 2008 साली विश्र्व शांती साठी व सर्वांच्या भल्यासाठी 15 नोव्हेंबर च्या दिनांकाला संध्याकाळी 4-15 ते 4-30 वाजे पर्यंत गुरूद्वऱ्यात व संपूर्ण जगभरात लोकांनी आप आपल्या ठिकाणी 15 मिनिटांसाठी सांसारिक गोष्टी विसरून फक्त व फक्त नामसिमरणा द्वारे श्री गुरु नानक देव जी नीं प्रदान केलेल्या “एक ओंकार, सतनाम,करतापूरख,निरभव, निरवैर, अकाल मुरत,अजुनी सैभगं, गुरुप्रसाद,जप,आद सच,जुगाद सच,हैभी सच, नानक हो सी भी सच” या मुलमंत्राचे सतत सर्वांनी एकत्रित पणे जाप करून मानवतेच्या भलाई साठी व विश्र्व शांती प्रस्थापित व्हावी या हेतूने ही नामसिमरणाची सुरूवात केली होती.
आज नांदेड मधून सुरू झालेल्या कार्याचे विशाल स्वरूप कार्यान्वित होऊन 15 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात लहान मोठ्या सर्व गुरूद्वऱ्यात व शिख धर्मावर आस्था ठेवणारे सर्व धर्मिय लोक या वेळेत मुलमंत्राचे सतत जाप पंधरा मिनिटे केल्या नंतर सर्वांच्या भल्यासाठी अरदास ( प्रार्थना) करतात.
तसे पाहिले तर प्रत्येक शिख दिवसातून अनेकदा सर्वांच्या भल्यासाठी रोज दिवसातून अनेकदा अरदास कळत नकळत करत असतो.कारण अरदासच्या शेवटी एक वाक्य म्हणणे जरुरीचे आहे.” गुरु नानक नाम चडदीकला तेरे भाणे सरबत का भला” ह्याचा अर्थ परमेश्वर तुझे नाव नेहमी प्रगती पथावरच आहे व तुझ्या नावामुळे सर्वाचे भले होऊ दे, ही गोष्ट आनंद असो दुःखाची वेळ असो, किंवा जितक्या वेळी आपण परमेश्वराचे चिंतन केल्यास अखेरीस हे बोलण्याची पंरपरा तीन चारशे वर्षांपूर्वी पासून सुरू आहे.
नामस्मरण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांदेडच्या गुरूद्वऱ्यात सर्वधर्मीय लोक फार मोठ्या प्रमाणात तास भर अगोदर पासूनच मिळेल त्या जागी ठांन मांडून बसून जातात.हा सोहळा पार पडल्या नंतर गुरूद्वऱ्यात प्रसाद,लंगर,फराळाची व थंड पेय,दुध, चहा ची उत्तम प्रकारे पुरवली जाते.
या वर्षाची विषेश बाब म्हणजे श्री गुरु नानक देव जी जयंती व सिमरन दिवस एकाच दिवशी आलेले आहेत. संध्याकाळी सव्वा चार वाजता सिमरन करण्याची सुरुवात केली जाईल. हे सर्व रमणीय प्रसंग पी टी सी सिमरन, टी वी चैनल , हजुर साहीब लाईव्ह युट्यूब चैनेल वरही लाईव्ह कार्यक्रम सर्व जगभरातील लोकांकरिता प्रदर्शित करण्यात येते.
नांदेडच्या सर्वधर्मीय लोकांनी आवाहन आहे की या मानवतेच्या भलाईच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा.
-राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ,
शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर सेक्टर नंबर 4 हजुर साहब नांदेड 7700063999*