ज्या वेळी गुरु नानक देव जी चा जन्म झाला त्या वेळी हिन्दुस्तानच्या लोकांची राजनैतिक, सामाजिक आणि धार्मिक दशा फार दयनीय अवस्था होती. संपूर्ण देश वेगवेगळ्या क्षेत्रात वाटल्या गेला होता. एका क्षेत्राचा राजा दुसऱ्या क्षेत्रातील राजाला पसंद करत नव्हता. आपसातील फुटी मुळे हिन्दुस्तान गुलामाचा गुलाम झाला होता. सगळीकडे बैचैनी, धोकाधडी,फरेब,चालाखी,मक्कारी चा बोलबाला झालेला होता. रक्षकच भक्षक बनलेले होते व ऐयाशी करण्यात मग्न झालेले होते. लाचखोरी मुळे न्याय मिळत नव्हते. धार्मिक अधोगती एवढी झाली होती की स्वतःला गुरू म्हणून घेणारे लोक पैसे घेऊन कानात गुरु मंत्र देणारे बनले होते. नाहक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लोक खरी ईश्वर पुजा व भक्ती पासुन वंचित झालेले होते……… सर्व लोक मुघल साम्राज्याचा अधिन झालेले व प्रतिकारशक्ती शक्ती गमावून बसलेल्या अवस्थेत होते… अशा परिस्थितीत लोकांना अधोगती पासून सुटका देण्यासाठी वीस ऑक्टोबर 1469 ई कार्तिक पौर्णिमा 1526 विक्रमी ला रायभोय तलवंडी ( सध्याचा ननकाणा साहीब जिल्हा शेखपुर पाकिस्तान) मध्ये श्री कल्याणदास मेहता जी व माता तृप्ताजी च्यां घरी क्षत्रिय घराण्यात श्री गुरु नानक देव जी महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासून अंधश्रद्धा व निरर्थक कर्मकांडला प्रखर विरोध करीत गुरुजींनी संपूर्ण जगभरात 24 वर्षे पायी यात्रा करत मानवाच्या कल्याणासाठी माणसाने आप आपल्या धर्मीशी व कर्माशी कसे वफादार राहावे याची शिकवण दिली. ही यात्रा चार टप्प्यांत केली यालाच उदासी असे म्हणतात. एवढेच नव्हे तर जे उपदेश लोकांना देत होते त्याचा वर स्वंता ही आपल्या आयुष्यात अंमलबजावणी केली……या यात्रेत बांगलादेश, पाकिस्तान,बर्मा, श्री लंका,भुटान, तिब्बत, सिक्कीम, नेपाल, मंगोलिया, तुर्की, इटली, अफगाणिस्तान, ईरान,इराक, सौदी,अरब इत्यादी ठिकाणी भ्रमण करत परमेश्वर प्राप्ती व जीवन जगण्यासाठी आवश्यक खऱ्या मार्ग दाखविण्याचे तसेच एकाच सृष्टी रचेता परमेश्वराची आराधना उपासना करने,भ्रम व कर्मकांडाच्या नादी न लागता ” किरत करो, वंड के चखो आणि नाम जपो व सर्वांच्या भलाई साठी नेहमी परमेश्वरा जवळ मागणी करा हा संदेश दिला. अर्थात स्वतः ची इमानदारी ने कमाई करा ती सर्वांना वाटून खा व या सृष्टी रचेता एकमेव परमेश्वराची आराधना उपासना करून त्याचा जवळ सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थने द्वारा मागणी करा. भारतात हरिद्वार, जगन्नाथ, बौद्ध गया,द्वारिका, कुरुक्षेत्र या सर्व हिंदू धर्मीय पवित्र स्थानाची यात्रा केली. श्री गुरु नानक देव जी ना पंजाब व भारतीय लोक सद्गुरू सच्चे पातशहा,अरब देशात पीर बाबा नानक, तिब्बती लोक नानक लामा भदरा गुरु, लंका मध्ये नानक बुध्दा,वियतनाम मंगोलिया, चीन मध्ये नानक भुसा, भूटान, नेपाल, सिक्कीम मध्ये रिमपोजे या नावाने संबोधतात……श्री गुरू नानक देव जी नी बाबर ला जाबर म्हणून संबोधले होते. म्हणजे जो सत्ताधारी राजा होता त्याच्या विरोधात बोलुन व त्याला आपल्या शिकवणीने खरा मार्ग दाखविला. गुरूजींच्यां यात्रेत सहभागी होणारे व नेहमी सोबत असणारे दोन अनुयायी होते एक बालाजी व दुसरे मर्दानाजी. गुरूजींनी सात सप्टेंबर 1539 ई (असू वदी 1596 विक्रमी) रोजी स्वतः वसविलेल्या करतारपुर ( पाकिस्तान) येथे आपला देह त्याग केला. या वेळी हिंदू व मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये भांडण होऊ लागले कि हिंदू धर्मीय आपल्या परंपरे नुसार देहाला अग्नी देण्यासाठी प्रयत्नशील होते व मुस्लिम समाज त्यांच्या रितीरिवाज प्रमाणे दफन करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु जेव्हा गुरुजीच्यां देहाचा कापड हटविल्या नंतर त्या ठिकाणी त्यांचा देह आढळून आला नाही. मग त्या चादरी चे दोन भाग करून हिंदू लोकांनी अग्नी भेट केले व मुस्लिम लोकांनी त्याच्या बाजूला दफन केले . आज करतारपुर येथे संस्कार केलेल्या ठिकाणी गुरुद्वारा व सोबतच कबर बनलेली आहे. सर्व धर्मीय लोक या दोन्ही पवित्र स्थळी नतमस्तक होतात. वर्तमान मध्ये भारत सरकारच्या व पाकिस्तान च्या आपसी सुसंवादा मुळे भारतीय लोकांना पासपोर्ट बैगैर गुरु महाराजाच्या अंतिम स्थानाचे दर्शन घेणे सुलभ बनलेले आहे. आजच्या काळात जर प्रत्येक धर्मीयांच्या लोकांनी गुरुजींनी दिलेल्या शिकवण आत्मसात करून त्या वर प्रामाणिक पणाने चालण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण जगभरात सुख शांती समाधान निश्चितच नांदेल यात शंका नसावी. आज श्री गुरु नानक देव जी च्यां जयंती निमित्त त्यांच्या शिकवणीचा थोडासा परिचय देण्याचा प्रयत्न.
-राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ
शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड 7700063999*