ओबीसी समाजातील विविध जातींमध्ये कॉंग्रेस भांडण लावते-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संविधानाने जात हा शब्द संपवला असला तरी आज नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने प्रचाराचे भाषण करतांना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी समाजातील माळी, वाणी, तांबोळी, कुंभार, सुतार, सोनार, निहाली, निराली, कासार, मनेरी, तेली, पांचाळ या जातींचा उल्लेख करून कॉंगे्रस पक्ष या जातींना आपसात लढविण्याचा डाव खेळत असल्याचा हा आरोप केला.
माहुरची आई रेणुका, उनकेश्वर महादेव, काळेश्र्वर यांच्या चरणी नतमस्तक होवून महात्मा बसवेश्र्वरांना कोटी-कोटी नमन करून नांदेडकरांना नमस्कार केला. संत नादमेव आणि स्वातंत्र्य सैनिकांना प्रणाम करून बीजेपी व एनडीएची एक मोठी लाठ महाराष्ट्रात सुरू आहे. इतरपर्यंतचे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये केले. आजच्या निवडणुक प्रचाराच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.अशोक चव्हाण खा.अजित गोपछडे यांच्यासह महायुतीचे 9 उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी नरेंद्र मोदी यांच्या शेजारच्या खुर्चीवर थोडा-थोडा वेळ बसून त्यांच्याशी बातचीत सुध्दा केली. भाषणा दरम्यान दोन श्रोत्यांनी आणलेल्या वस्तु सुरक्षा रक्षकांना घेण्यास सांगितल्या आणि त्यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, ओबीसी या संघटनेला छोट-छोट्या गटांमध्ये तोडून कॉँगे्रस आरक्षण बंद करणार असल्याचा आरोप करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु ते राहुल गांधी यांचा उल्लेख केला. बटेंगे तो संख्या कम होगी असे सांगतांना त्यांनी एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा सल्ला उपस्थितांना दिला. भारताचा विकास तेंव्हाच शक्य आहे. जेंव्हा महाराष्ट्र संपन्न असेल, महाराष्ट्राचे प्रत्येक कुटूंब विकसीत असेल. एससी, एसटी आणि ओबीसी समाजामध्ये एकजुटता नव्हती तेंव्हा कॉंगे्रस एकत्र होती. आज एक ओबीसी पंतप्रधान आहे म्हणून कॉंगे्रस ओबीसी ओळख संपविण्याचा प्रयत्न करत आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करून त्यांचा वारसा संपविणाऱ्यांना तुम्ही धड्डा शिकवा असे आवाहन केले. कारण महाराष्ट्राची जमीन ही स्वाभिमानाची भुमी आहे आणि कॉंगे्रसला हारवा, त्यांना माफ करू नका अशा शब्दात उपस्थितीतांना आवाहन केले. कॉंगे्रसमुळेच भारतात दोन संविधान चालले. एक देशात आणि काश्मिरमध्ये कलम 370 मुळे दुसरे संविधान. एनडीएच्या काळात काश्मिरमध्ये दहशतवाद संपला, एससी, एसटींना त्यांचे अधिकार मिळाले याचा उल्लेख केला.
कॉंग्रेसने घोटाळेच घोटाळे केले आणि आता तर त्यांनी घोटाळे करण्याचा आपला ईतिहास मोडला. याबद्दल बोलतांना कॉंगे्रस पक्षातील लोक एक लाल पुस्तक घेवून ते संविधान असल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात त्या पहिल्या पानावर भारताचे संविधान असे लिहिलेले दिसते. आतील सर्व पाने कोरी आहेत हा प्रकार म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. 1977 मधील एमरजन्सीमध्ये सुध्दा कॉंग्रेसने हाच प्रकार केला होता असे सांगितले.
एनडीए समोर भारतातील शेतकरी हा सर्वात मोठा केंद्र बिंदु आहे. नांदेडमधील 5 लाख शेतकऱ्यांना 1 हजार 500 कोटी रुपये अनुदान दिले. सोयाबीन संकटात आले त्याही वेळी आर्थिक मदत केली. महाराष्ट्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली, रेल्वे कोच फॅक्ट्री, समृध्दी महामार्ग आणि शक्तीपिठ महामार्गांमुळे नांदेड आणि आसपासच्या भागांमधील प्रगतीमध्ये गती आली. नांदेड येथून दिल्ली आदमपुर विमान सेवा सुरू झाली आहे. अमृतसर येथे सुरू होणार आहे. आम्ही 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्देश ठरविले आहे. प्रत्येक योजनांमध्ये नारी शक्तीला स्थान दिले जाते.
महाराष्ट्राने कॉंगे्रसचे पाप आणि प्रकोप खुप झेलला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचे जनक कॉंगे्रस आहे. त्यासाठीच महाराष्ट्रातील 11 सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. एनडीएने मराठवाडा वॉटर ग्रिड परियोजना सुरू केली. पण आघाडी सरकार आल्यानंतर ती योजना बंद करून कॉंगे्रसने नवीन पाप केले.
आताच हरीयाणामध्ये एनडीएला आजपर्यंत ईतिहासात मिळाल्या नाहीत. एवढ्या जागा जनतेने दिल्या आहेत. त्याचाच किता महाराष्ट्राची जनता गिरविणार असल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. मी सध्या डबल ड्युटी करतो आहे कारण नांदेडमध्ये दोन निवडणुका आहेत. काही महिन्यांपुर्वी तिसऱ्यांदा एनडीए सरकार आले. आपण त्यावेळी नांदेडचे फुल मला पाठविले नाही. ते यंदा पाठवा असे सांगितले. तसेच सर्व 9 विधानसभा मतदार संघातील एनडीए उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कॉंगे्रस पक्ष पाकिस्तान आणि दहशतवादद्यांना पाठींबा देतो. दहा वर्षात 1 सुट्टी न घेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे.राज्यात विकास गंगा आम्हीच आणणार या गोदामाईचे पाणी विरोधकांना पाजणारच अॆ सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना वाढली आणि विरोधकांच्या पायाखालची वाळु घसरली असा उल्ले करून एकनाथ शिंदे यांनी घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ या निशानीवर शिक्का मारुन एनडीएला विजयी करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!